घरताज्या घडामोडीरामायण मालिकेच झालं होतं मराठीत डबिंग पण आता होणार 'या' वाहिनीवर प्रदर्शित!

रामायण मालिकेच झालं होतं मराठीत डबिंग पण आता होणार ‘या’ वाहिनीवर प्रदर्शित!

Subscribe

रामानंद सागरनिर्मित आणि दिग्दर्शित 'रामायण' या पौराणिक मालिकेची लोकप्रियता इतक्या वर्षांनंतरही तसूभरही कमी झालेली नाही.

लॉकडाऊनमध्ये दुरदर्शनवर पुन्हा एकदा ९० च्या दशकातील गाजलेला मालिका प्रदर्शित केल्या जाऊ लागल्या आणि प्रेक्षकांनी या मालिकांना भरघोस प्रतिसाद दिला. रामायण, महाबारत या मालिकांना पुन्हा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या मालिकांमुळे दुरदर्शनही टीआरपीमध्ये नंबर १वर आलं. ९० च्या काळात रामायण सुरू झाल्यावर रस्त्यावर शुकशुकाट असायचा हे आपण ऐकले आहे. पण हीच रामायणाची क्रेझ आजही आहे. याचा अनुभव २०२० मधील प्रेक्षकांनीही घेतला. टीआरपीच्या चार्टमध्ये रामायण या धार्मिक मालिकेने इतर सर्व मनोरंजन वाहिन्यांना मागे टाकले आहे.

रामानंद सागरनिर्मित आणि दिग्दर्शित ‘रामायण’ या पौराणिक मालिकेची लोकप्रियता इतक्या वर्षांनंतरही तसूभरही कमी झालेली नाही. महिन्याभरापूर्वी ही मालिका दूरदर्शन वाहिनीवर पुन्हा भेटीस आली. आता लवकरच ही मालिका मराठीतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

- Advertisement -

खरतर रामायण ही मालिका हिंदीमध्ये चित्रीत करण्यात आली होती. पण रामानंद सागर यांनी मालिकेचे मराठी भाषेत डबिंग करून ठेवले होते. परंतु,  तेव्हा ती मराठीतून कोणत्याही वाहिनीवर प्रसारित झाली नव्हती. आता बऱ्याच वर्षांनंतर पहिल्यांदाच मराठीतून ‘रामायण’ ही मालिका प्रक्षेपित होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या १ जूनपासून रात्री ९ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची माहिती वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड सतीश राजवाडे यांनी दिली.


हे ही वाचा – शाहरूखने चोरली ‘बेतालची’ कथा, मराठी लेखकांनी केला आरोप!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -