पतीच्या हत्येचा कट रचणारी महिला गजाआड, प्रियकराची आत्महत्या

पतीच्या हत्येचा कट रचणारी महिला गजाआड, प्रियकराची आत्महत्या

बंगळुरूमध्ये एका महिलेने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. ही महिला दुसऱ्या पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या आईला आणि कामासाठी बोलावलेल्या तीन आरोपांना पोलिसांनी अटक केली आहे. या 26 वर्षीय महिलेचे नाव अनुपल्लवी आहे, तिचे नवीन कुमार यांच्याशी लग्न झाले होते.

ही महिला पीन्याजवळील डोड्डाबिदारकल्लू येथे राहत होती. महिलेचे हिमवंत कुमार नावाच्या व्यक्तीसोबत संबंध होते आणि ती या कटात सहभागी होती. दोघांनी मिळून कॅब ड्रायव्हर नवीनच्या हत्येचा कट रचला. या कामासाठी हरीश, नागराजू आणि मुगिलन या तीन जणांना गटात सहभागी केले आणि दोन लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले.

एका इंग्रजी वृत्त पत्राने दिलेल्या माहितीनुसार, या तिघांना ९० हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले, उर्वरित रक्कम काम झाल्यानंतर द्यायची होती. २३ जुलै रोजी हरीश आणि त्याच्या दोन साथीदारांनी नवीनचे अपहरण करून तामिळनाडूला नेले. मात्र, दोघांनाही त्याला मारण्याचे धाडस दाखवता आले नाही. त्यानंतर आरोपींनी नवीनशी मैत्री केली आणि त्याच्यासोबत पार्टी केली.

रिपोर्टनुसार, जेव्हा अनुपल्लवी आणि हिमवंत यांनी त्यांना काम पूर्ण झाल्याची चौकशी करण्यासाठी बोलावले. तेव्हा आरोपींनी नवीन कुमारच्या अंगावर टोमॅटो केचअप ओतले आणि त्याचा फोटो काढून अनुपल्लवी आणि हिमवंत यांना पाठवला.

हा फोटो पाहिल्यानंतर हिमवंत प्रचंड घाबरला आणि त्याने आत्महत्या केली. नवीन कुमारच्या बहिणीने 2 ऑगस्ट रोजी पोलिसात त्याचा भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पण नवीन 6 ऑगस्ट रोजी परत आला आणि त्याने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी अनुपल्लवी आणि हिमवंत कुमार यांचे फोन तपासले. त्यानंतर अनुपल्लवी आणि इतर सहभागी होणाऱ्या आरोपींनी पोलिसांनी अटक केली.


हेही वाचा : …म्हणून मद्रास हायकोर्टाने दुचाकी अपघातातील मृताच्या कुटुंबीयांना दिलेली भरपाई केली रद्द


 

First Published on: August 22, 2022 9:51 PM
Exit mobile version