तिला भोवली एक ‘मिठी’

आपल्या आवडत्या व्यक्तिला मिठी मारणे हा गुन्हा नाही, पण एक मिठी तिला इतकी भोवली की, तिची रवानगी थेट कारागृहात झाली. हे घडले आहे सौदी अरेबियामध्ये. एका गाण्याच्या कार्यक्रमात स्टेजवर जाऊन तिने थेट गायक माजिद- अल -मोहानदिसला मिठी मारली. सौदीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय झालं?

सौदी अरेबियातील ताहिफ या शहरात शुक्रवारी रात्री गायक माजिद-अल-मोहानदिसचा  गाण्याचा कार्यक्रम होता. तो गात असताना अचानक एक महिला स्टेजच्या दिशेने धावली आणि तिने थेट जाऊन माजिदला घट्ट मिठी मारली. तिला पाहता तेथील सुरक्षारक्षकांनी माजिदला तिच्या मिठीतून सोडवले आणि तिला थेट पोलिसांनी अटक केली.

वाचा-अखेर सौदीतील महिलांना मिळाले ड्रायव्हिंग लायसन्स

तिचा गुन्हा काय?

सौदी अरेबियात महिलांना कोणत्याही सार्वजनिक समारंभात जाण्याची परवानगी गेल्यावर्षी पर्यंत नव्हती. पण  हे नियम गेल्यावर्षी  सौदी अरेबियाचा राजा मोहम्मद बीन सलमान यांनी हे नियम शिथिल करत सार्वजनिक समारंभात जाण्याची परवानगी महिलांना देण्यात आली. ही परवानगी त्यांना कार्यक्रमात जाण्याची असली तरी त्यांना महिलांना इतक्या मुक्तपणे सार्वजनिक ठिकाणी विहार करण्याची परवानगी नाही, असे असताना या महिलेने परपुरुषाला मिठी मारल्यामुळे तिला अटक करण्यात आली. या महिलेला अल तरिफ फाऊंडेशन या ठिकाणी नेण्यात आले असून तिच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या  व्हिडिओत या महिलेने तेथील नियमांनुसार कपडे घातले आहेत. पण हे वर्तन नियमांत बसत नाही, असे सांगण्यात आले आहे.

वाचा- फॉर्म्युला वनमध्ये सौदी अरेबियाची महिला

कोण आहे माजिद-अल-मोहानदिस?

द प्रिन्स ऑफ अरब सिंगिंग नावाने माजिद ओळखला जातो. मुळचा इराकचा असलेल्या माजिदकडे सौदी अरेबियाचे नागरिकत्व आहे. त्याची अनेक गाणी प्रसिद्ध असून तो लाईव्ह कॉन्सर्ट करतो. या घटनेनंतर तो आपले कार्यक्रम थांबवणार नसल्याचे त्याने त्याच्या वेबसाईटवरुन स्पष्ट केले आहे. पण या झालेल्या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया देणे त्याने टाळले आहे.

गायक माजिद-अल-मोहानदिस
First Published on: July 15, 2018 11:56 AM
Exit mobile version