अहो आश्चर्यम, आता रोबोटही देणार मुलांना जन्म

अहो आश्चर्यम, आता रोबोटही देणार मुलांना जन्म

अहो आश्चर्यम, आता रोबोटही देणार मुलांना जन्म

हल्लीच्या युगात कोणत्याही गोष्टीची शक्यता आपण नाकारु शकत नाही. रोबोट म्हणजे मानवाचे काम हलके करणारे मानवनिर्मित यंत्र.आता हेच यंत्र मुलांनाही जन्म देणार असल्याचे जगभरातील पहिल्या ‘जिवंत रोबोट’ बनवणाऱ्या अमेरिकी शास्त्रज्ञांचे, म्हणणे आहे. ‘जिवंत रोबोट्स’ हे झेनोबॉट्स म्हणून ओळखले जातात. आफ्रिकन बेडकांच्या स्टेम सेलचा वापर करून जगातील पहिला ‘जिवंत,स्व-उपचार करणारा’ रोबोट तयार केला आहे. आता व्हरमाँट युनिव्हर्सिटी, टफ्ट्स युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या वायस इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल इन्स्पायर्ड इंजिनीअरिंगमध्ये झेनोबॉट्स विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, त्यांनी प्राणी किंवा वनस्पतींपासून जैविक पेशी वेगळ्या केल्या आहेत. त्यानुसार पुनरुत्पादन करणाऱ्या रोबोटचा पूर्णपणे नवीन प्रकार सापडला आहे. हा विज्ञानाचा नवा अविष्कार आहे.

‘जिवंत रोबोट’ म्हणजे काय?

वास्तविक, हा रोबोट Xenobots जैविक रोबोटची अपडेटेड वर्जन आहे, ज्याचे गेल्या वर्षी अनावरण करण्यात आले होते. शास्त्रज्ञांनी बेडकाच्या पेशींपासून हा जिवंत रोबोट तयार केला आहे. हा अतिशय छोटा रोबोट एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकतो. तज्ज्ञांच्या मते, माणसांप्रमाणेच बेडूक पेशी शरीर बनवतात. ते एक प्रणाली म्हणून काम करतात.

झेनोबॉट्स तयार करण्यासाठी, वैज्ञानिकांनी बेडकांच्या भ्रूणातील जिवंत स्टेम पेशी काढून टाकल्या आणि त्यांना उष्मायनासाठी सोडले. संगणक विज्ञान आणि रोबोटिक्सचे प्राध्यापक जोश बोंगार्ड म्हणाले, “बहुतेक लोक रोबोट्सला धातू आणि सिरॅमिकपासून बनवलेले समजतात, परंतु हा रोबोट अनुवांशिकदृष्ट्या अपरिवर्तित बेडूक पेशींनी बनलेला जीव आहे.”

 


हे ही वाचा – जगातील दिग्गज टेक कंपन्यांची कमान भारतीयांकडे, पराग अग्रवाल यांच्यासह भारतीय वंशाचे १० सुपर बॉस


 

First Published on: November 30, 2021 4:15 PM
Exit mobile version