भारतासह जगातील ३५ देश करताहेत कृत्रिम सूर्याची निर्मिती

गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणातील बदलांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याचपार्श्वभूमीवर गेल्या १० वर्षांपासून महाकाय चुंबकाची निर्मिती करण्यात येत आहे. हे चुंबक म्हणजे कृत्रिम सूर्यच असून त्याच्या निर्मितीमुळे पृथ्वीवर मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या चुंबकाचे नाव सेंट्रल सोलेनॉयड असून त्याच्या निर्मिती खर्चासाठी अमेरिका, रशिया व अन्य देशाबरोबरच भारतानेही निधी दिला आहे.

ही चुंबकीय विशालकाय मशीन इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लियर एक्सपेरिमेंटल रिअॅक्टर (आयटीइआर) चाच एक भाग आहे. या चुंबकीय मशीनचा उद्देश्य पृथ्वीवर सूर्यासारखी उर्जा निर्माण करणे आहे. हे चुंबक ५९ फूट उंच असून त्याचा व्यास १ फूट आहे. त्याचे वजन १००० टन एवढे आहे. हे चुंबक जनरल अॅटामिक्सने तयार केले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात या चुंबकाची निर्मिती झाली असून आता पुढील प्रक्रीयेसाठी ते फ्रान्सला पाठवण्यात येणार आहे. ही विशायकाय मशीन बनवण्यासाठी अमेरिका, चीन, जपान, कोरिया, भारत, रशिया, युके आणि स्वित्झरलँड या देशांनी निधी दिला आहे. ही मशीन ७५ टक्के पूर्ण झाली आहे. २०२५ पर्यंत ही मशीन पूर्ण होणार असून नंतर त्यात पहील्यांदाच प्लाझ्मा जनरेट केला जाणार आहे.

First Published on: June 18, 2021 2:15 PM
Exit mobile version