CoronaVirus: निरोगी लोकांना करणार कोरोना पॉझिटिव्ह? WHO ची संमती!

CoronaVirus: निरोगी लोकांना करणार कोरोना पॉझिटिव्ह? WHO ची संमती!

प्रातिनिधीक फोटो

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एका वादग्रस्त चाचणीला संमती दर्शविली आहे. या चाचणीमध्ये निरोगी लोकांना कोरोना संक्रमित केले जाईल. यासाठी काही लोकांची मदत WHO ने मागितली आहे. मात्र यामुळं लोक गंभीर आजारी पडण्याचा धोका असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

डेली मेलच्या अहवालानुसार, जागतिक आरोग्य संघटनेनेचे असे म्हणणे आहे की, निरोगी स्वयंसेवकांना कोरोनाचा पॉझिटिव्ह केल्यास, लस तयार करण्याच्या प्रक्रियेस वेग येईल. या कारणास्तव, आरोग्य संघटनेनेही या प्रक्रियेला नैतिकदृष्ट्या योग्य असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून या कोरोना लसीच्या चाचण्यांबाबत आठ अटी निश्चित केल्या आहेत. या अंतर्गत केवळ १८ ते ३० वयवर्षे वयोगटातील लोकांना ही नवी लस शोधण्यासाठी समाविष्ट करण्यात येणार आहे.

कोरोनावर कोणतीही लस नसल्याने धोका

निरोगी लोकांना कोरोना पॉझिटिव्ह केल्यानंतर त्यांच्यावर या लसीचा नेमका कोणता परिणाम होतो हे पाहणे देखील एक आव्हानात्मक चाचणी असणार आहे. या सारखे प्रयोग मलेरिया, टायफाइड, फ्लूची लस तयार करण्यासाठी करण्यात आले होते. मात्र या आजारांवर उपचार करण्यासाठी औषधे उपलब्ध होती. कोरोनावर कोणतीही लस अद्याप नसताना जीवाला धोका असल्याचे ही सांगण्यात येत आहे.

लस शोधण्यासाठी प्रक्रिया सुरू

ज्या लोकांना आधीच कोरोना संसर्ग झाला आहे त्यांच्यावर ही लस चाचणी केली जाते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि इम्पीरियल कॉलेज लंडनकडून ही चाचणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तथापि, ही प्रक्रिया अधिक वेळ घेत आहे. त्यामुळे वेग वाढविण्यासाठी या आव्हानांची चाचणीची चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाचे रूग्ण सतत वाढत आहेत. रविवारी सकाळी भारतात जवळपास ६३ हजार कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर २ हजार १०९ लोकांनी आपला जीव गमावला आहे.


चहल कामाला लागले, परदेशी सुट्टीवर गेले

 

First Published on: May 10, 2020 2:00 PM
Exit mobile version