जगाला मिळाला पाचवा महासागर, नाव आहे Southern Ocean

जगाला मिळाला पाचवा महासागर, नाव आहे Southern Ocean

जगाला मिळाला पाचवा महासागर, नाव आहे Southern Ocean

अखेर जगाला पाचवा महासागर मिळाला आहे. सागर असलेल्या या समुद्राला महासागराची मान्यता मिळाली आहे. ही मान्यता नॅशनल जियोग्राफिक सोसायटीने दिली आहे. या मान्यतेनंतर जगातील महासागरांच्या यादीत या नव्या महासागराचा समावेश झाला आहे. या महासागराचे नाव सर्दन ओशन (Southern Ocean) असे ठेवण्यात आले आहे. पृथ्वीवर अटलांटिक, प्रशांत, हिंदी आणि आर्कटिक महासागर असून आता या सर्दन महासागराचेही नाव त्यात समाविष्ट झाले आहे.

हा पाचवा महासागर सर्वाधिक थंड आहे. कारण त्यावर बर्फाच्छादीत टेकड्या, हिमपर्वत आणि ग्लेशियर आहेत. ८ जून रोजी वर्ल्ड ओशन डे दिनी नॅशनल जियोग्राफिक सोसाइटी (NGS)ने या सागराला महासागर अशी मान्यता दिली.

NGS चे भूगोलतज्ज्ञ एलेक्स टेट यांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्रत्रांकडून सर्दन महासागराला मान्यता देण्यात येत नव्हती. यामुळे महासागराच्या यादीतही त्याचा समावेश नव्हता. पण आता त्याला मान्यता मिळाल्याने शाळा कॉलेजच्या अभ्यासक्रमातही त्याचा समावेश होईल. यामुळे विद्यार्थ्यांना हवामान,व महासागराचे वैशिष्ट्यांची माहिती शिकवली जाईल.

महासागरांच्या यादीत अंटार्कटिकाचा समावेशही १९१५ साली करण्यात आला होता. त्यानंतर NGS ने चार महासागरांच्या सीमा आखल्या व त्यानुसार महाद्विपाच्या सीमांच्या आधारावर त्यांना नावं देण्यात आले.

पण या नवीन सर्दन ओशनला कोणत्याही महाद्विपाच्या नावाने संबोधण्यात आले नाही. कारण हा महासागर अंटार्कटिक सर्कमपोलर करंट (ACC)ने वेढलेला आहे. शास्त्रज्ञांच्या मते या ACC चा निर्मिती ३.४ कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. ज्यावेळी दक्षिण अमेरिकपासून अंटार्कटिका वेगळे झाले होते. या नवीन महासागराचा शोध १६ व्या शतकात स्पॅनिश संशोधक वास्को नुनेज डे बालबोआ लावला होता. त्याचबरोबर या महासागराचं आंतरराष्ट्रीय महत्वही त्यांनी सांगितले होते. याच महासागरातून मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील समुद्री व्यापार व्हायचा. तसेच याच महासागरात संशोधनही केले जाते.

First Published on: June 17, 2021 5:15 PM
Exit mobile version