Corona Vaccine : दिलासा! रूसची वॅक्सीन १० ऑगस्टपर्यंत येऊ शकते

Corona Vaccine : दिलासा! रूसची वॅक्सीन १० ऑगस्टपर्यंत येऊ शकते

जगभरात कोरोनाचे संकट असताना लस बनवण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. विविधा देशांमध्ये कोरोना विषाणूविरोधात लस तयार केली जात असून त्यांच्या चाचण्या होत आहेत. नुकतेच रूसनेही त्यांनी बनवलेल्या लसीची चाचणी पूर्ण झाली असल्याचे म्हटले आहे. तसेच ही लस १० ऑगस्टपर्यंत येऊ शकते, अशी माहिती त्यांच्या आरोग्य मंत्र्यांनी दिल्याचे समजते. ही लस दि गामालेया इंस्टिट्युटने बनवली आहे. त्या शिवाय आणखी दोन कंपन्यांनी क्लिनिकल ट्रायल करण्याची परवानगी दिली आहे. याच इंस्टिट्युटने १० ऑगस्टपर्यंत ही लस बाजार येऊ शकते असा दावा केला आहे.

स्पूतनिक न्यूज डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार रूसचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्को यांनी सांगितले की, गामालेया यांनी बनवलेल्या लसीची चाचणी पूर्ण झाली आहे. आता त्या शास्त्रज्ञांवर निर्णय सोपवला आहे की त्यांनी ही लस बाजारात कधी आणायची. मॉस्को येथील दि गामालेया इंस्टिट्युटमधील शास्त्रज्ञांनी गेल्या महिन्यात दावा केला होता की, ऑगस्टच्या मध्यापर्यंत लसीला परवानगी मिळू शकते. त्यामुळे पुढील दोन आठवड्यात लस रूस कोरोना विषाणूची लस बाजारात आणू शकते. ही लस सर्वात आधी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्यांना दिली जाईल. त्यानंतर सर्वसामान्यांना देण्यात येईल, असे इंस्टिट्युटच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हेही वाचा –

‘राम मंदिर हा न्याय आणि सत्याचा विजय; ओवेसी आता रडणे बंद करा’

First Published on: August 7, 2020 9:49 AM
Exit mobile version