Coronavirus: कोरोनाच्या मृत्यूने ३ लाखांचा आकडा ओलांडला; वाचा सर्व आकडेवारी

Coronavirus: कोरोनाच्या मृत्यूने ३ लाखांचा आकडा ओलांडला; वाचा सर्व आकडेवारी

जगभरात कोरोना व्हायरसमुळे थैमान माजले आहे. अनेक देशांनी लॉकडाऊन घोषित करुन देखील कोरोना व्हायरसचे संक्रमण काही केल्याने थांबत नाही. जगभरात कोरोना व्हायरसने ४४ लाख ३८ हजार ५६९ लोक बाधित झाले आहेत. तर ३ लाख १ हजार ८८८ लोक मृत्यू पावले आहेत. तर आतापर्यंत १५ लाख ८१ हजार लोक बरे देखील झाले आहेत. लॉकडाऊनमुळे एका बाजुला अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे, तर दुसऱ्या बाजुला कोरोना व्हायरसमुळे लोक संक्रमित होत आहेत, या दुहेरी संकटामध्ये जग सध्या अडकले आहे.

ईरानमध्ये व्यापार सुरु

ईरानने अफगानिस्तानशी असलेले व्यापारी संबंध पुन्हा सुरु केले आहेत. तसेच ईरान आणि पाकिस्तान सीमेवर असलेले सिस्तान आणि बलुचिस्तान सीमेवरी बंधने उचलली आहेत. ईरानमध्ये १ लाख १६ हजार ६३५ रुग्ण आढळले असून ६,९०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सिडनीत बार आणि कॅफे खुले झाले

ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या न्यू साउथ वेल्समध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा बार आणि कॅफे सुरु झाले. या प्रांतातील सर्वात मोठे शहर सिडनी आहे. एप्रिल महिन्यात सहा लाख लोकांनी नोकरी गमावली असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने दिली. तर पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांनी सांगितले की लोकांना पुढे आणखी काही धक्के पचवावे लागणार आहेत.

लंडन जूनपर्यंत होणार कोरोनामुक्त

कॅम्ब्रिज विद्यापीठ आणि सार्वजनिक आरोग्य इंग्लंडद्वारे शुक्रवारी प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार जून महिन्यापर्यंत लंडन कोरोनामुक्त होईल, असे सांगितले जाते. २३ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा झाली होती. तेव्हा प्रत्येक दिवशी २ लाख रुग्ण सापडत होते.

न्यूयॉर्कमध्ये पाच शहरातले लॉकडाऊन मागे

न्यूयॉर्कमध्ये टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या पाच शहरांमध्ये बांधकाम, उत्पादन आणि रिटेल क्षेत्रात कामकाज सुरु झाले आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क शहराला सर्वाधिक कोरोनाचा फटका बसला आहे. न्यूयॉर्कमध्ये ३ लाख ४३ हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

१५ मे रोजीची जागतिक कोरोनाग्रस्तांची आकडेवारी
First Published on: May 15, 2020 10:12 PM
Exit mobile version