Wrestlers Protest : कुस्तीपटूंनी गृहमंत्र्यांची घेतली भेट, बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी 

Wrestlers Protest : कुस्तीपटूंनी गृहमंत्र्यांची घेतली भेट, बृजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी 

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह अटकेची मागणी करण्यासाठी कुस्टीपटूंनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. ऑलिम्पिक विजेती साक्षी मलिकची आई सुदेश मलिक यांनी एका वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे. या भेटीदरम्यान गृहमंत्र्यांनी कुस्तीपटूंवर कोणताही भेदभाव न करता संपूर्ण चौकशीचे आश्वासन दिले आहे. (Wrestlers meet Home Minister, demand arrest of Brijbhushan Singh)

खाप पंचायतींनी केंद्राला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला असताना बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शहा यांनी पैलवानांची भेट घेतली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री अकराच्या सुमारास भेट घेतली. या दोघांमध्ये ही बैठक सुमारे दीड तास चालल्याचे समजते.

माध्यमातून वृत्तानुसार आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी अमित शाह यांच्याकडे बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी केली आहे. गृहमंत्र्यांनीही कुस्तीपटूंवर कोणताही भेदभाव न करता संपूर्ण चौकशीचे आश्वासन दिले आहे. कुस्तीपटूंनी अमित शाह यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कुस्तीपटूंनी भेट घेतल्यानंतर अमित शाह म्हणाले की, या प्रकरणी कायदा स्वतःचा मार्ग काढेल. पोलीस तपास करत आहेत. पोलिसांना त्यांचे काम करण्यासाठी वेळ देऊ नको का? असा प्रश्न त्यांनी कुस्तीपटूंना विचारला.

साक्षी मलिकची आईने दिली माहिती
रविवारी ऑलिम्पियक विजेती साक्षी मलिकची आई सुदेश मलिक यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, साक्षी, विनेश आणि बजरंग यांनी शनिवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सुमारे एक ते दीड तास चाललेल्या बैठकीत गृहमंत्र्यांनी तिन्ही खेळाडूंना उत्साहाऐवजी संवेदनशीलतेने वागण्यास सांगितले. सुदेश मलिक म्हणाल्या की, शाह यांनी कुस्तीपटूंना आंदोलन संपवण्यास सांगताना कोणत्याही खेळाडूवर कारवाई केली जाणार नसल्याचे सांगितले. बैठकीत कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्या अटकेसाठी आग्रह धरला असता कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई केली जाईल, असे अमित शाह यांनी सांगितले.

सर्व संघटनांना एका व्यासपीठावर बोलावून निर्णय घेतला जाईल
दरम्यान, बजरंग पुनियाने रविवारी सोनीपत येथील मुंडलाना पंचायत गाठली आणि कोणताही निर्णय घेऊ नका, असे आवाहन केले. यावेळी त्याने लवकरच सर्व संघटनांना एका व्यासपीठावर आणून मोठी पंचायत बोलविण्यात येणार असल्याचे त्याने सांगतिले. पुनियने सांगितले की, याबाबत तीन-चार दिवसांत निर्णय घेतला जाईल. त्यानंतर प्रत्येकाला पंचायतीचे ठिकाण, वेळची माहिती दिली जाईल आणि या पंचायतीत पुढील निर्णय घेतला जाईल.

 

First Published on: June 5, 2023 1:24 PM
Exit mobile version