चायनीज बंदीचा झटका; शाओमीचे दोन App बंद

चायनीज बंदीचा झटका; शाओमीचे दोन App बंद

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, भारताने ५९ चीनी App वर बंदी घातली होती. त्याचा फटका आता शाओमीच्या ब्रँडलाही बसला आहे. चीनी App च्या बंदीत स्मार्टफोन कंपनी शाओमीच्या दोन App चा समावेश होता. या App मध्ये Mi Video आणि Mi Community सुद्धा आहे. या कंपनीने App वर बंदी घातली होती. त्यानंतर कंपनीने App आणि वेबसाईटला डिसेबल केले आहे.

शाओमीचे पत्रक

पिउनिका वेबच्या माहितीनुसार, आता जर युजर्स Mi Community India च्या युआरएलवर गेल्यास त्यांना एक अधिकृत नोटिस दिसते. कंपनीकडून आणखी एक शेअर केलेली नोटिसमध्ये म्हटले की, भारत सरकारच्या निर्देशाचे पालन करीत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. Mi फॅन्सच्या प्रायव्हसी आणि सिक्योरिटी आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. शाओमी इंडियाकडून यासारखेच स्टेटमेंट दिले आहे. टिकटॉक कडून ज्याप्रमाणे मिळत होते. शाओमी युजर्सना आता अधिकृत अॅक्सेस मिळणार नाही. कोणत्याही मदतीसाठी ग्लोबल एमआय कम्यूनिटी किंवा XDA फोरमची मदत भारतीय युजर्स घेवू शकतात, असे ऑफिशल फोरम डिसेबलचे पत्रक जारी केले आहे.

हेही वाचा –

खुशखबर! ‘भारतात कोरोनावरील लस १५ ऑगस्टपर्यंत येणे शक्य’

First Published on: July 13, 2020 10:52 PM
Exit mobile version