‘किसान का बेटा’ आता जपानच्या पंतप्रधानपदी

‘किसान का बेटा’ आता जपानच्या पंतप्रधानपदी

'किसान का बेटा' आता जपानच्या पंतप्रधान पदी

जपानच्या पंतप्रधानपदावरुन शिंजो आबे पायउतार झाले असून आता त्यांच्या जागी लवकरच एका शेतकऱ्याचा पुत्र पंतप्रधानाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार आहे. योशिहिदे सुगा हे जपानचे नवे पंतप्रधान होणार आहेत. सध्या सुगा जपान सरकारमध्ये मुख्य कॅबिनेट सचिव असून ते शिंझो आबे यांचे विश्वासू आहेत. आबेंचा वरदहस्त असल्याने नवीन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुगा यांचे नाव आघाडीवर होते. अखेर त्यांनाच जपानचे पंतप्रधानपद भूषवण्याचा बहुमान मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिंझो आबे आजारी होते. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदाची खुर्ची सोडण्याची घोषणा केली होती. दरम्यान, जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी सत्तेत आहे. तसेच शिंझो अचानक पद सोडत असल्याची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तसेच त्यांच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शिंजो आबे यांना खासगीत बोलावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

दरम्यान, योशिहिदे सुगा जपानमधील नवे पंतप्रधान असतील, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर या चर्चेला पूर्णविरोम मिळाला असून योशिहिदे सुगा यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. आज, १४ सप्टेंबर रोजी जपानच्या सत्ताधारी पक्षामध्ये नवीन नेत्याच्या निवडणुकीवर मतदान झाले. सुगा यांनी ही निवडणूक जिंकली असून एलडीपीने आपला नवीन नेता निवडल्यानंतर पुन्हा बुधवारी जपानच्या संसदेत मतदान होईन, जिथे बहुसंख्य आकडा असल्याने एलडीपीच्या नेत्याने जिंकणे अपेक्षित आहे.


हेही वाचा – मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडेंसह १७ खासदारांना कोरोनाची लागण


First Published on: September 14, 2020 4:49 PM
Exit mobile version