‘मॉक ड्रिल’च्या प्रशिक्षणावेळी तरुणीचा अपघाती मृत्यू

‘मॉक ड्रिल’च्या प्रशिक्षणावेळी तरुणीचा अपघाती मृत्यू

तरुणीला 'मॉक ड्रील' चे प्रशिक्षण देताना हा अपघात घडला

कोईंबतूर मधल्या महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘मॅाक ड्रिलच्या’ प्रशिक्षणावेळी एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा दुसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. एन. लागेश्वरी असे या तरुणीचे नाव आहे. कोवाई कलाईमगल महाविद्यालयात हा प्रकार घडला असून अपघातात मृत्यू झालेली विद्यार्थीनी बीबीएच्या द्वितीय वर्षात शिकत होती. या महाविद्यालयात मॅाक ड्रिलचे प्रशिक्षण देण्यात येत होते. या सरावादरम्यान दुसऱ्या मजल्यावरुन या तरुणीला प्रशिक्षकाने धक्का दिला त्यामुळे ती खाली कोसळली. पण पहिल्या मजल्याच्या कठड्यावर तिचे डोके आपटल्याने तिला गंभीर ईजा झाली. ईमारतीच्या खाली असलेल्या तरुण तरुणींनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे प्रशिक्षण

महाविद्यालयातील विद्यार्थांना राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे प्रशिक्षण देण्याचे काम सुरु होते, या दरम्यान सुरु असलेल्या सरावावेळी हा अपघात झालेला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत असून या व्हिडीओत तरुणीला ढकलताना प्रशिक्षक स्पष्ट दिसत आहेत. व्हिडिओत ज्या तरुणीचा मृत्यू झालेला आहे ती या सरावासाठी पूर्णपणे तयार नसताना प्रशिक्षकाने तिला दुसऱ्या मजल्यावरुन ढकलल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. प्रशिक्षकाला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅालेज व्यवस्थापन आणि प्रशिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.

First Published on: July 13, 2018 12:24 PM
Exit mobile version