तरुणाई ठरतेय कोरोनाची ‘सुपरस्प्रेडर’, तज्ज्ञांनी लसीकरणाची केली मागणी

तरुणाई ठरतेय कोरोनाची ‘सुपरस्प्रेडर’, तज्ज्ञांनी लसीकरणाची केली मागणी

तरुणाई ठरतेय कोरोनाची 'सुपरस्प्रेडर', तज्ज्ञांनी लसीकरणाची केली मागणी

देशभरात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असून महाराष्ट्रासह दिल्ली, गडचिरोली, मध्यप्रदेशमध्ये कोरोना रुग्ण सर्वाधिक आहेत. यात दरम्यान अनेक राज्यात तरुणाई कोरोनाची सुपरस्प्रेडर ठरत असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीचा विचार केला असता दिल्लीमध्ये सध्या ६५ टक्के रुग्ण हे ४५ वर्षाखालील आहेत. तर महाराष्ट्रासह मुंबईमध्येही हेच चित्र दिसत आहे. संसर्गाचे प्रमाण या वयोगटामध्ये २१.५३ टक्के असून त्याखालोखाल ४१ ते ५० या वयोगटामध्ये हे प्रमाण १८.१० टक्के इतके दिसून आले आहे. य़ावर तज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्यावर्षीच्या तुलनेत आता कमी वयाच्या कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस दिली पाहिजे अशी मागणी तज्ज्ञांनी केली आहे. कोरोना तज्ज्ञांच्या मते, देशात कोरोना संक्रमण वाढण्यास विषाणूमधील म्यूटेशन कारणीभूत ठरत आहे. दिल्लीत डबल म्युटेशन, साउथ आफ्रिकन म्युटेशन आणि युके म्युटेशन वेगाने पसरत आहे. आत्तापर्यंत झालेल्या अभ्यासात यापूर्वीच्या व्हायरसच्या तुलनेत आता म्युटेड व्हायरस वेगाने पसरत आहे. परंतु यामध्ये मृत्यूंची संख्या तुलनेने कमी आहे.

तज्ज्ञांच्या मते, देशात १८ ते ४५ वर्षावरील सर्वाधिक नागरिक आणि तरुण वर्ग दररोज ऑफिस आणि इतर व्यावसायिक कामांमध्ये जास्त एक्टिव्ह असतो. शॉपिंग, रेस्टॉरंट, पार्टी, सिनेमा पाहणे यांमध्ये तरुणाईची संख्या अधिक आहे. या तरुणाईच्या मते, कोरोना संसर्ग हा आजारी, वयस्कर नागरिकांना होतो असे वाटते. परंतु तरुण वर्गातही कोरोना संक्रमण सर्वाधक होत असल्याचे समोर येत आहे. आजही मोठ्याप्रमाणात तरुण वर्ग कामानिमित्त किंवा इतर काही कारणास्तव फिरत आहे. यामुळे ते अप्रत्यक्षरित्या कोरोना सुपरस्प्रे़डर ठरत आहेत. यातही सहआजार असलेल्या तरुणांचे प्रमाण जास्त आहे, तसेच वैद्यकीय उपचारासाठी तरुण खूपच विलंबाने जात असल्याचे दिसून येत आहे. इतर वयाच्या तुलनेत तरुणाईच कोरोना संसर्गास कारणीभूत ठरत आहे.

अशास्थितीत देशात वयस्कर नागरिकांसह १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस दिली पाहिजे अशी मागणी तज्ज्ञांनी केली आहे. केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेत १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याची परवानगी द्यावी. कारण सध्याच्या घडीला १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात ८ टक्के लसीकरण झाले आहे. त्य़ामुळे याचा वेगाने जर लसीकरण सुरु राहिले तर देश हार्ड इम्युनिटी स्तरावर पोहचू शकतो.


 

First Published on: April 12, 2021 9:04 AM
Exit mobile version