इयर फोनमुळे तरुणाने गमावले प्राण

इयर फोनमुळे तरुणाने गमावले प्राण

इयर फोनमुळे तरुणाने गमावले प्राण

आजकाल लहान मुलांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांच मोबाईलचे व्यसन लागले आहे. प्रत्येक व्यक्ती मोबाईलमध्ये व्यस्त झालेले आपल्याला पाहायला मिळत. लहान मुले गेम खेळण्यात तर तरुण पिढी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतं. तसेच काही व्यक्तींना गाणी ऐकण्याचे आणि चॅटींग करण्याचे देखील तिकेच वेड असलेले पाहायला मिळते. काही व्यक्ती झोपताना कानामध्ये इयर फोन घालून देखील झोपतात. हे वाढलेले फॅड जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना मलेशियात घडली आहे. एका तरुणाने रात्री झोपेत गाणी ऐकत इयर फोन कानात घालून झोपल्याने तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहे. मोहम्मद आदिल अजहर जहारिन (१६) असे या तरुणाचे नाव आहे.

नेमके काय घडले?

मलेशियातील के नगरी मधील रेम्बू शहरात राहणाऱ्या तरुणाला गाणे ऐकण्याची सवय होती. हा तरुण रात्री उशीरापर्यंत इयर फोन लावून गाणी ऐकायचा. काही दिवसांपूर्वी रात्री इयर फोन कानाला लावून मोबाईल चार्जिंगला ठेवून तो गाणी ऐकत होता. ती गाणी ऐकता ऐकता या तरुणाला झोप लागली. सकाळ झाल्यानंतर आईने मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो उठलाच नाही. त्याला गाढ झोप लागली असावी असे तिला वाटले. त्यामुळे ती नेहमीप्रमाणे आवरुन कामाला निघून गेली. संध्याकाळ झाल्यानंतर ती घरी परत आली असता तिला मोहम्मद झोपलेचा दिसला. तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठलाच नाही. आईने मुलाला पाहिले असता त्याच्या नाकातून रक्त येत असल्याचे तिला दिसले. मोहम्मदच्या आईने मोहम्मदला तातडीने रुग्णालयात घेऊन गेली असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

यामुळे झाला मृत्यू

मोहम्मदच्या मृत्यूचे कारण समजावे यासाठी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्या शवविच्छेदन अहवालात मोहम्मदला शॉक लागल्याने त्याता मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मोहम्मद कानाला इयर फोन लावून झोपला होता. शिवाय त्याच्या कानात इयर फोन देखील होते. मोबाईलची बॅटरी पूर्ण चार्ज झाली होती. ती तापल्यामुळे त्यातील करंट इयर फोनमधून मोहम्मदच्या कानात गोला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

First Published on: December 10, 2018 11:29 AM
Exit mobile version