तुम्हालाही नोकरीसाठी कुणी पैसे मागतंय? वेळीच सावध व्हा!

तुम्हालाही नोकरीसाठी कुणी पैसे मागतंय? वेळीच सावध व्हा!

मोबाइलवरून क्रेडिट कार्ड, ओटीपी क्रमांक घेऊन तीस हजारांचा गंडा

बेरोजगारीमुळे देशात एकीकडे मोठ्या संख्येने तरूण नैराश्याच्या छायेखाली असताना दुसरीकडे अशा तरुणांना फसवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भामटे तयार झाले आहेत. अशा तरुणांना खोटी आशा दाखवून फसवायचे आणि नंतर त्यांचे पैसे घेऊन फरार व्हायचे असा एककलमी कार्यक्रम या भामट्यांच्या टोळ्यांकडून राबवला जातो. आपल्यापैकीही अनेकांना अशा प्रकारे नोकरी देण्याचं आमिष दाखवणारी टोळी नोकरीच्या बदल्यात पैसे मागताना दिसते. पुरेसे सजग नसलेले तरूण हे पैसे देतातही. पण नंतर त्यांच्यावर पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरा मार्ग राहात नाही.

प्रत्येकी १ कोटींची फसवणूक

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरपूरमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. तब्बल २१ तरुणांना एका भामट्याने फसवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नोकरीचं आमिष दाखवून या तरुणांना या भामट्यांनी प्रत्येकी १ कोटी रुपयांना फसवलं आहे. यासंदर्भात मुझफ्फरनगर पोलिसांनी सहा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – कर्जाच्या आमिषाने फसवणूक करणार्‍या भामट्याला अटक


पीडितांना दिली बनावट नियुक्तीपत्र

सर्व पीडित २१ तरुणांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या भामट्यांच्या टोळीने पीडितांकडून नोकरी देण्याच्या बदल्यात प्रत्येकी १ कोटी रूपये घेतले. तसेच त्यांना बनावट नियक्ती पत्रही दिली. जेव्हा सर्व पीडितांनी नोकरीच्या संदर्भात संबंधित विभागाकडे ही नियुक्ती पत्र सादर केली, तेव्हा त्यांना सगळा प्रकार लक्षात आला अशी माहिती मुझफ्फरपूरचे एसएचओ अनिल कापेरवन यांनी दिली. दरम्यान, या भामट्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

First Published on: September 6, 2018 5:45 PM
Exit mobile version