घरमुंबईकर्जाच्या आमिषाने फसवणुक करणार्‍या भामट्याला अटक

कर्जाच्या आमिषाने फसवणुक करणार्‍या भामट्याला अटक

Subscribe

कर्जाच्या आमिषाने फसवणुक करणार्‍या एका भामट्याला पायधुनी पोलिसांनी अटक केली आहे. अनुपकुमार ढोडाई आग्रहारी ऊर्फ गुप्ता असे या 25 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्या इतर चार सहकार्‍यांचा आता पोलीस शोध घेत आहेत. दिल्लीतून ही टोळी अनेकांना कर्जासाठी फोन करुन फसवणुक करीत असल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईसह नवी मुंबईत या पाचही आरोपीविरुद्ध अनेक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.  तक्रारदार पायधुनी येथील जंक्शन ऑफ युसूफ मेहरअली रोडवरील कर्मशियल चेंबरच्या केजीएन परफ्युम कॉर्नरमध्ये नोकरी करतात. 22 फेब्रुवारीला त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. त्याने स्वत:चे नाव राज मल्होत्रा असल्याचे सांगून तो रिलायन्स कॅपिटल या कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना कर्जाची गरज आहे का अशी विचारणा केल्यानंतर त्यांची कंपनी कमी व्याजदरात लवकरात लवकर लोन मंजूर करुन देते, असे आमिष दाखवले.

एक लाख ३५ हजार जमा
तक्रारदारांने त्याला दहा लाख रुपयांची लोनची गरज असल्याचे सांगितले. त्यांना लोनची आवश्यकता असल्याने त्याने त्यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणी करुन त्यांना लोनच्या प्रोसेसिंगची माहिती दिली. दुसर्‍या दिवशी अजय मल्होत्रा या तरुणाने त्यांना फोन करुन सर्व कागदपत्रे एका मेलवर पाठविण्यास सांगितले. तसेच त्यांना लोनसाठी 50 हजार रुपयांचा एक बॉण्ड बनवून द्यावा लागेल असे सांगितले. बॉण्डची ही रक्कम त्यांनी, त्याने सांगितलेल्या बँक खात्यात जमा केली. अशा प्रकारे वेगवेगळ्या नावाने त्यांना फोन करुन आणखीन 85 हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. एक लाख 35 हजार रुपये जमा केल्यानंतर 1 जूनपासून त्यांचे मोबाईल बंद येऊ लागले होते.

- Advertisement -

अनेकांची फसवणूक
आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पायधुनी पोलिसांत तक्रार केली होती. या आरोपीचा शोध सुरु असतानाच शनिवारी अनुपकुमार आग्रहारी याला पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात त्याच्यासह त्याचे चार सहकारी राजेंद्र दशन सिंग, सचिन ब्रिजसिंग सिरोही, विक्रांत शिशुपाल सिंग, प्रशांत ब्रिजेससिंग चौधरी यांनी तक्रारदारासह अनेकांना वेगवेगळ्या नावाने कर्जासाठी फोन करुन त्यांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले. अनुपकुमारच्या अटकेनंतर इतर चौघांचा आता पोलीस शोध घेत आहेत. यापूर्वी या पाचही आरोपींना नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केली होती.


गणपतीला गावी जाणार्‍यांची प्रतिक्षा यादी वाढती

ganesh idol
गणेश मुर्ती

मुंबई | गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधीपासून कोकणाकडे रवाना होणार्‍या विशेष गाडयांचे आरक्षण फुल्ल झाले असून आता प्रवाशांची गर्दी विशेष अनारक्षित गाड्यांच्या घोषणेवर आहे.
तसेच या गाडयांची प्रतीक्षा यादीही ४००च्या पुढे गेल्यामुळे अनेक प्रवाशांना जादा भाडे मोजून बसमार्गे गाव गाठावे लागणार आहे. तर, दुसरीकडे रेल्वे, एसटी बसेस फुल्ल झाल्यामुळे लक्झरी बसेसचेही दर वाढले आहेत. ते आता ९०० रुपयांवर पोहोचले आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून २,२२५ बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, यामध्ये ऑनलाइन आरक्षण करण्याची संधी एसटी महामंडळाने दिली असून आतापर्यंत २००० बसचे आरक्षण फुल्ल झाले आहेत. एसटी महामंडळाकडून ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीदरम्यान चाकरमान्यांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिल्याने आतापर्यंत २००० बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. मुंबई विभागातून आजपर्यंत ६११, तर ठाणे विभागातून २२५ गाड्यांची आगाऊ नोंदणी झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -