छत्तीसगडमध्ये मोहाच्या फुलापासून सॅनिटायझरची निर्मिती!

छत्तीसगडमध्ये मोहाच्या फुलापासून सॅनिटायझरची निर्मिती!

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी प्रत्येकजण आपल्यापरीने प्रयत्न करत आहे. कुठे कमी पैशात पीपीई किट आणि टेस्टिंग किट तयार केले जात आहेत. तर कुठे कमी पैशात व्हेंटिलेटर तयार केले जात आहेत. छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात महिला स्वयं सहाय्यता समूहाने एकत्र येऊन महुआच्या फुलापासून हँड सॅनिटायझर बनवले आहे. या आधी या राज्यात महुआच्या फुलापासून दारू बनवण्यात येत होती. छत्तीसगडमध्ये महुआची खूप झाडं आहेत. महुआची झाडं ही आदिवासींच्या जगण्यातील महत्त्वाचा बाग आहे. इथले आदिवासी महुआच्या फुलांना एकत्र करतात आणि बाजारात विकतात. ही फुलं दारू बनवण्यासाठी उपयोगाला येतात. आता आदिवासी जशपुर जिल्ह्यात महुआच्या फुलांपासून सॅनिटायझर बनवण्यात आलं आहे.

महुआ फुलापासून कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी हँड सॅनिटायझर तयार केलेले युवा वैज्ञानिक समर्थ जैन म्हणतात, आम्हाला माहिती आहे की नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. महुआ हँड सँनिटायझर विकसित करण्याचा विचार आमच्या मनात आला कारण पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरची कमी भासत होती.

समर्थ जैन फार्मास्युटिक यांच्याविषयी ज्ञान त्यांना आहे. त्यांची जशपुरमध्ये कंपनी आहे. या कंपनीत कृषी आणि हर्बल संबंधित उत्पादनांची निर्मिती केली जाते. जैन म्हणाले, या जिल्ह्यात महुआची झाडं खूप आहेत. त्याचा केवळ दारू बनवण्यासाठी उपयोग केला जात होता. आता सॅनिटायझर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मी जिल्हा प्रशासनाच्या वन विभागाशी संपर्क केला. त्यांनीही लगेच होकार दिला. मग आम्ही वन विभागाच्या मदतीने तीन दिवसांत मोहापासून सॅनिटायझर बनवले. आत्तापर्यंत ३० लिटर हँड सॅनिटायझरची निर्मिती करण्यात आली आहे. १०० मिलीलीटरच्या बॉटल तयार करण्यात आल्या. आता ड्यूटीवर असणाऱ्या पोलिसांना याचे वाटप करण्यात येणार आहे. हे सॅनिटायझर पूर्णत: हर्बल आहे. त्याचा कोणताही दुष्पपरिणाम होणार नाही.


हे ही वाचा – दोन लग्न करणं पडलं महागात, दुसऱ्या बायकोला द्यावे लागणार ६० लाख रूपये!


 

First Published on: May 1, 2020 10:40 AM
Exit mobile version