‘या’ नव्या फीचरसह TikTok ला टक्कर देणार YouTube!

‘या’ नव्या फीचरसह TikTok ला टक्कर देणार YouTube!

TikTok हे अॅप हे ज्या प्रकारे लोकप्रिय झाले आहे की इतर मोठ्या कंपन्यादेखील त्याच धर्तीवर अ‍ॅप्स आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मवरुन फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोघेही TikTok शी स्पर्धा करण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत.  या दरम्यान, या शर्यतीत यूट्यूबही आले असून यूट्यूब एक नव्या फीचरची चाचणी करीत आहे ज्या अंतर्गत यूजर्स १५ सेकंदाचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. यूट्यूबने म्हटले आहे की, मल्टी सेगमेंट व्हिडिओ फीचरच्या मदतीने काही यूजर्सना शॉर्ट व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा पर्याय दिला जाणार आहे.

विशेष म्हणजे YouTube चे हे मल्टी सेगमेंट व्हिडिओ चाचणी Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मर्यादित यूजर्ससाठी जारी करण्यात येत आहे. क्रिएटर्स या फीचरच्या मदतीने थेट मोबाइल अॅपवरून अनेक क्लिप रेकॉर्ड करू शकणार आहेत.

असे तयार करता येणार युजर्सना व्हिडिओ

यूट्यूबने सांगितले की, कंपनी क्रिएटर्ससाठी नवीन आणि सोप्या मार्गाची चाचणी करीत आहे. यामुळे युजर्स अनेक क्लिप्स थेट व्हिडिओ म्हणून सहज रेकॉर्ड आणि अपलोड करू शकतील. तसेच हे एका मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून देखील करता येणार आहे. यासाठी शॉर्ट व्हिडिओसाठी मोबाइल अपलोड फ्लोमध्ये create a video वर क्लिक केल्यानंतर टॅप आणि होल्ड बटणावरूव युजर्सना रेकॉर्डिंग करता येणार आहे. प्रथम क्लिप रेकॉर्ड केली जाईल. यानंतर हे बटण सोडावे लागेल आणि रेकॉर्डिंग थांबेल. अशा प्रकारे युजर्स त्यांचे १५-१५ सेकंदांचे व्हिडिओ तयार करू शकतील.

यूट्यूब हे नवं फीचर आणण्याच्या तयारीत

कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर युजर्सना मोठे व्हिडिओ अपलोड करायचे असतील तर त्यांना थेट गॅलरीमधून अपलोड करावे लागतील. इंस्टाग्राम आणि टिक टॉकवर लोक शॉर्ट व्हिडिओकडे जात असल्याने, यूट्यूब ही तसं फीचर आणण्याच्या तयारीत आहे.


Google भारतातील लघु उद्योग व्यावसायिकांना देणार कर्ज
First Published on: June 26, 2020 5:12 PM
Exit mobile version