JioMeet विरोधात Zoom करणार कायदेशीर कारवाई?

JioMeet विरोधात Zoom करणार कायदेशीर कारवाई?

‘कॉपी-पेस्ट’ केल्याचा आरोप

Zoom व्हिडिओ कॉलिंग सॉफ्टवेअर गेल्या काही महिन्यांत जगभरात लोकप्रिय झाले आहे. रिलायन्स जिओने भारतातील Zoomशी स्पर्धा करण्यासाठी JioMeet व्हिडिओ कॉलिंग App लाँच केले. परंतु या अ‍ॅपचे आयकॉन, युजर इंटरफेस आणि फीचर्स Zoom शी अगदी साम्य दर्शवणारे आहे. तसेच JioMeet चे फिचर्स देखील Zoom सारखेच आहेत. त्यामुळे JioMeet विरोधात Zoom आता कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता आहे.

लॉकडाउनमध्ये देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप Zoom भारतात चांगलंच लोकप्रिय झाल्याचे बघायला मिळाले तर इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, रिलायन्स जिओविरोधात Zoom कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता आहे. दरम्यान JioMeet लाँच झाल्यानंतर Zoom व्हिडिओ कम्युनिकेशन्सचे भारतातील प्रमुख समीर राजे यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, “नुकत्याच लाँच झालेल्या रिलायन्स JioMeet आणि Zoom मधील साम्य पाहून मी आश्चर्यचकित झालो” तसेच, “याविरोधात कायदेशीर मार्ग अवलंबण्याबाबत कंपनीत अंतर्गत बरीच चर्चा सुरू आहे” असेही त्यांनी यावेळी सांगितले. यासह कारवाईबाबतचा निर्णय आमची लीगल टीम घेईल, असेही राजे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, Zoom च्या आधीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप्स होते, आणि Zoom आल्यानंतरही काही App लाँच केले गेले. मात्र कंपनीने असे काही फिचर्स दिले आहेत ते लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, ”आम्हाला हे माहितच होते की हे होणार आहे. हे ठीक आहे, कारण Zoom ला स्पर्धा घेण्याची ही पहिली वेळ नाही. आमचे प्रोडक्ट आणि टेक्नॉलॉजी आमची ताकद आहे. आमचे स्पर्धक काय करतात ती त्यांची रणनीती आहे.”असे राजे म्हणाले.

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, राजे यांनी म्हटले आहे की, Zoom ची टीम इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी (MeitY) चर्चा करीत आहे. विशेष म्हणजे Zoom वरही यूजर्सचा डेटा शेअर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीने हे नाकारले असून आम्ही डेटा शेअर करत नाही, तर आम्ही फक्त तांत्रिक गोष्टी शेअर करतो, असे कंपनीचे म्हणने आहे.


Online ऑर्डर केलं सोनं! उघडून पाहिलं आणि निघालं…
First Published on: July 10, 2020 10:48 AM
Exit mobile version