झायडस कॅडीलाला Fulvestrant Injection ची अंतिम मंजुरी, कॅन्सरवर होईल उपचार

झायडस कॅडीलाला Fulvestrant Injection ची अंतिम मंजुरी, कॅन्सरवर होईल उपचार

झायडस कॅडीला Fulvestrant Injection ची अंतिम मंजुरी, कॅन्सरवर होईल उपचार

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने झायडस कॅडीला (Zydus Cadila) कंपनीच्या फुलवेस्ट्रेंट इंजेक्शनला (Fulvestrant Injection)अंतिम मान्यता दिली आहे. अशी माहिती झायडस कॅडीला कंपनी शुक्रवारी जाहीर केली. हे इंजेक्शन ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचारांसाठी वापरले जाते.

हार्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह, एडवाइंस ब्रेस्ट कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर हा आजार शरीराच्या इतर भागात पसरतो. या आजारावर आता फुलवेस्ट्रेंट इंजेक्शनचा वापर डायरेक्ट किंवा इतर औषधांसोबत केला जाणार आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले की, झायडस कॅडिलाला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने फुलवेस्ट्रेंट इंजेक्शन, २५० मिलीग्रॅम/ ५ एमएल (५० मिलीग्रॅम/एमएल) प्रति सिंगल-डोस-प्री-फिल्ड सिरिंजला बाजारात उपलब्ध होण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे.

झायडस कॅडीलाने म्हटले की, या इंजेक्शनची निर्मिती अहमदाबादच्या झाइडस बायोलॉजिकल ग्रुपच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये केली जाईल. त्याचवेळी, ग्रुपला आतापर्यंत ३२० इंजेक्शनच्या मंजुरी प्राप्त झाली आहे. २००३-०४ आर्थिक वर्षात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून ४०० पेक्षा अधिक नवीन इंजेक्शनसाठी अर्ज (ANDAs) दाखल करण्यात आला आहे.


भारीच! धोनीच्या ‘या’ स्वॅगचा सोशल मिडियावर बोलबाला


 

First Published on: July 30, 2021 5:36 PM
Exit mobile version