जगन घाणेकर यांचा इको फ्रेंडली ‘बाप्पा’

जगन घाणेकर यांचा इको फ्रेंडली ‘बाप्पा’

इको फ्रेंडली देखावा

घाटकोपर येथील अल्ताफ नगर या ठिकाणी राहणारे जगन घाणेकर हे गेल्या दहा वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत असून ते इको फ्रेंडली बाप्पाची स्थापना करत आहेत. त्यांच्याकडे ७ दिवसांचा गणपती असतो. यावर्षी त्यांनी इको फ्रेंडली मखर तयार केले आहे. हा देखावा तयार करण्यासाठी पुठ्ठा, कागद आणि कापड यांचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. पहिल्या वर्षांपासूनच सजावटीमध्ये थर्माकॉलचा वापर करायचा नाही असे आम्ही ठरवले होते. सुरुवातीपासून गणपतीची आरास आम्ही कुटुंबीय मिळून करतो. ही सजावट करण्यामध्ये आमच्या ७५ वर्षाच्या आईपासून ते आमचा ४ वर्षाचा मुलगा वेदांत आम्ही सर्वच जण सहभागी होत असल्याचे घाणेकर कुटुंबियाने सांगितले आहे.


 

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.

तुमचे सेल्फी अपलोड करण्यासाठी क्लिक करा… 

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

First Published on: September 17, 2018 2:59 PM
Exit mobile version