कल्याणच्या राज भानुशालींचा म्युझिकल बाप्पा!

कल्याणच्या राज भानुशालींचा म्युझिकल बाप्पा!

राज भानुशाली यांच्या घरचं म्युझिकल डेकोरेशन!

‘संगीत हीच साधना आहे’, असं आपण अनेक जाणकारांना बोलताना ऐकलं आहे. पण कल्याणमधल्या राज भानुशाली यांनी ते सत्यात उतरवून दाखवलं आहे. यंदा त्यांचा गणेश अशाच संगीतमय वातावरणात विराजमान झाला आहे. त्यांचं संपूर्ण घर विविध संगीत वाद्यांनी भरलेलं आहे. गणेशाची मूर्ती देखील शाडूची आहे आणि सजावट ही कोणत्याही प्रकारे प्लास्टिकचा वापर न करता पूर्णपणे कागद, चहाचे ग्लास, जुन्या लग्नपत्रिका, कॅलेंडर वापरून केली आहे. गेल्या ३० वर्षांपासून ते गणेशोत्सव साजरा करतात. विशेष म्हणजे त्यांच्या गणेशाचं विसर्जन देखील पर्यावरण पूरक पद्धतीनेच म्हणजे घराच्या खाली पाण्याच्या टाकीत होते. आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी परिसरातल्या झाडांना टाकले जाते.


जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा कान्टेस्ट बद्दल


माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करू शकता.


तुम्हाला हे माहिती आहे का? – डीजे आणि डॉल्बीच्या आवाजावरील बंदी कायम


तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

First Published on: September 22, 2018 9:00 PM
Exit mobile version