श्रुती म्हस्केंनी मुलीसोबत घरीच साकारला बाप्पा!

श्रुती म्हस्केंनी मुलीसोबत घरीच साकारला बाप्पा!

श्रुती म्हस्केंनी मुलीसोबत साकारला बाप्पा

मुलांवर चांगले संस्कार व्हावेत अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. श्रृती म्हस्के यांचीही अशीच काहीशी इच्छा आहे. त्यांच्या मुलीमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी त्यांनी इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.

यंदा जरी त्यांचं इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचं पहिलंच वर्ष असलं, तरी त्यांचा उत्साह मात्र दांडगा आहे. घरच्या घरी गणेश मूर्ती घडवण्यासाठी त्यांनी शाडूच्या मातीचा वापर केला. त्यांनी आणि त्यांच्या मुलीने मिळून ही मूर्ती घडवली. या मूर्तीसाठी पोस्टर कलरचा त्यांनी वापर केला. शिवाय कापड आणि फुलांची सजावट केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गणेश मूर्तीचं विसर्जन देखील त्या घरच्या घरीच करणार आहेत. त्यामुळे त्यांचा खऱ्या अर्थाने संपूर्णपणे इको-फ्रेंडली गणेशोत्सव आहे असंच म्हणावं लागेल!


जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल


माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.


तुमचे सेल्फी अपलोड करण्यासाठी क्लिक करा… 


तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…


तुम्हाला हे माहिती आहे का? – आता बाप्पाचा प्रसादही ऑनलाइन… तोही फ्री-होम डिलीव्हरी

First Published on: September 17, 2018 8:38 PM
Exit mobile version