पाण्याचे महत्त्व विषद करणारा गणपती बाप्पा

पाण्याचे महत्त्व विषद करणारा गणपती बाप्पा

पाण्याचे महत्त्व विषद करणारा गणपती बाप्पा

कल्याणचे रहिवासी सतीश मनगुटकर यांनी आपल्या सोसायटीमध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला आहे. त्यांनी ‘पाणी पुन:प्रक्रिया’ या विषयावर देखावा केला आहे. देखाव्यामध्ये मूर्ती स्नान करत आहे आणि ते पाणी पुन:प्रक्रिया करून त्यामधून शेती पिकवण्याचे दृश्य निर्माण केले आहे. सजावटीसाठी सर्व टाकाऊ वस्तूंचा वापर करून कमी खर्चात पर्यावरणाला हानी न पोहोचवता सामाजिक संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तसेच मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवलेली असल्यामुळे आम्ही सोसायटीच्या आवारातच तिचे विसर्जन करत असल्याचे मनगुटकर यांनी सांगितले.
मागच्या चार वर्षांपासून मनगुटकर इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत असून सजावटीसाठी बांबूची चटई, सुके गवत, गहू पिक, माती, भंगारातले पाईप, स्टिलची बादली, पुठ्ठ्याचा बॉक्स, भंगारातले वॉटर प्युरिफायर आणि रंगासाठी माती वापरली आहे.


जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा कान्टेस्ट बद्दल


माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करू शकता.


तुम्हाला हे माहिती आहे का? – डीजे आणि डॉल्बीच्या आवाजावरील बंदी कायम


तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

First Published on: September 21, 2018 6:05 PM
Exit mobile version