जयंत कापसे यांचा इको फ्रेंडली बाप्पा

जयंत कापसे यांचा इको फ्रेंडली बाप्पा

अष्टविनायकांपैकी एक पाली बल्लाळेश्वर गणपतीचे प्रतिरूप

जयंत कापसे गणेशोत्सव दहा वर्षांपासून साजरा करत असून सलग पाच वर्षे ते इको फ्रेंडली बाप्पाची स्थापना करत आहेत. त्यांच्याकडे ११ दिवसांचा गणपती असतो. यावर्षी त्यांनी अष्टविनायकांपैकी एक पाली बल्लाळेश्वर गणपतीचे प्रतिरूप बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हा बाप्पा संपूर्ण सुती कापड, साबुदाणा खळ यापासून पूर्णपणे पोकळ जेमतेम पावशेर वजनाचा हा गणपती आहे. सजावट फक्त फुले रांगोळी आणि पडदे वापरून केली आहे.
गणेशोत्सव साजरा करण्याची म्हणजे इको फ्रेंडली प्रेरणा खुद्द गणरायाने दिली. कारण बाप्पाची विसर्जनावेळी होणारी विटंबना आणि प्रदूषण यामुळे मन हेलावले आणि माझ्या घरात मी ही प्रथा सुरू केली असल्याचे कापसे सांगतात.

कापसे कुंटुंबीय

 

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.

तुमचे सेल्फी अपलोड करण्यासाठी क्लिक करा… 

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

First Published on: September 16, 2018 10:03 PM
Exit mobile version