लक्ष्मणनगर गणेशोत्सव मंडळाचा इको फ्रेंडली ‘बाप्पा’

लक्ष्मणनगर गणेशोत्सव मंडळाचा इको फ्रेंडली ‘बाप्पा’

टीशू पेपरपासून साकरला 'बाप्पा'

जोगेश्वरी येथील लक्ष्मणनगर गणेशोत्सव मंडळाने नव्या संकल्पनेतून यावर्षी टिश्यूपेपरपासून बनवलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. विसर्जनादरम्यान होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेऊन या मंडळाने यातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे या भागातील महिलांनी वर्षभर आपल्या हातखर्चातून एक एक पैसा जमा करून ही मूर्ती आणण्याचा निर्णय घेतला होता. फक्त गणेशमूर्तीच नाही, तर मंडप सजावटीसाठीही कापड, कागद आणि प्लायवूडचा वापर करून हा देखावा साकारण्यात आला आहे.


जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा कान्टेस्ट बद्दल


माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करू शकता.


तुम्हाला हे माहिती आहे का? – आता बाप्पाचा प्रसादही ऑनलाइन… तोही फ्री-होम डिलीव्हरी


तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

First Published on: September 21, 2018 2:18 PM
Exit mobile version