धर्मसुधारक राजा राममोहन राय

धर्मसुधारक राजा राममोहन राय

 

राजा राममोहन राय हे आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक व ब्राह्यो समाजाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 22 मे 1772 रोजी पश्चिम बंगालमधील राधानगरी येथे झाला. राममोहन यांचे बंगाली, फार्सी व संस्कृत या तीन भाषांचे प्राथमिक अध्ययन घरीच झाले. वयाच्या अठराव्या वर्षी ते बिहारमधील पाटणा येथे अरबी आणि फार्सी यांच्या शिक्षणासाठी गेले. कुराणाचाही त्यांनी अभ्यास केला. वयाच्या सोळाव्या वर्षी ते आपल्या गावी परतले. त्या वेळी तुलनात्मक अध्ययन करून त्यांच्या लक्षात आले, की विविध देवदेवता व त्यांचे अवतार यांची आणि मूर्तीची पूजा करणे अयोग्य आहे.
कारण एकच अद्वितीय परमेश्वर आहे. त्यांनी आपले मूर्तिपूजाविरोधी विचार आपल्या पित्याला व मातेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. माता पिता आणि राममोहन यांच्यामध्ये जबरदस्त मतभेद उत्पन्न झाला. मतभेदामुळे राममोहन यांना घर सोडावे लागले. 1970 मध्ये स्वगृही परतल्यावर मातापित्यांचा रागही निवळला होता, परंतु मातापित्यांची त्यांनी निराशा केली. त्यांची मूर्तिपूजाविरोधी व बहुदेवतावादविरोधी मते अधिकच ताठर व कणखर बनली होती. भोवतालचा सामाज सनातनी व रूढीनिष्ठ असल्याने त्यांचा द्वेष करू लागला. नंतर कौटुंबिक जबाबदार्‍या वाढल्याने घरची सांपत्तिक स्थिती ठीक असूनही त्यांना सरकारी नोकरी पत्करावी लागली. 1818 मध्ये सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून समाजातील प्रतिष्ठित मंडळींच्या सह्यांसह एक अर्ज त्यांनी सरकारकडे पाठवला. त्यावेळचे गव्हर्नर ज. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी राममोहनांशी प्रदीर्घ चर्चा करून सतीबंदीच्या कायद्याची निश्चिती केली. 4 डिसेंबर 1829 रोजी सतीबंदीचा कायदा जाहीर केला. अशा या महान धर्मसुधारकाचे 27 सप्टेंबर 1833 रोजी निधन झाले.

First Published on: May 22, 2023 4:15 AM
Exit mobile version