10 Years of Don 2: डॉन २च्या शूटिंगवेळी शाहरुखने दाबला होता प्रियंकाचा गळा

10 Years of Don 2: डॉन २च्या शुटींगवेळी शाहरुखने दाबला होता प्रियंकाचा गळा

शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा यांनी एकत्र बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवलेला डॉन २ हा सिनेमा प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला होता. डॉन २ या सिनेमाला तब्बल १० वर्ष पूर्ण झाली आहेत. फरहान अख्तर दिग्दर्शित डॉन २ या सिनेमात शाहरुख प्रियंका सोबतच अभिनेत्री लारा दत्ता,ओम पुरी,बोमन ईरानी आणि कुणाल कपूर प्रमुख भूमिकेत होते. डॉन२ हा डॉन या हिंदी सिनेमाचा सिक्वेल होता. सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिनेमाविषयीच्या काही इन्स्ट्रेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया.

प्रियंका आणि शाहरुखमध्ये वाढली जवळीक

डॉन २ सिनेमासाठी प्रियंका आणि शाहरुखच्या जोडीला प्रेक्षकांची तूफान पसंती मिळाली. शूटिंगवेळी शाहरुख आणि प्रियंका सतत एकत्र होते. दोघांमधील जुनी मैत्री पुन्हा नव्याने सुरू झाली होती. मीडिया रिपोर्टनुसार, डॉन २ सिनेमाच्या शूटिंगवेळी शाहरुख आणि प्रियंकामधील जवळकी इतकी वाढली होती की त्यामुळे शाहरुखचा संसार तुटण्याची वेळ आली होती. दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाल्यानंतर मात्र दोघांनी त्याचे स्पष्टीकरण दिले होते.

शाहरुख खानला घाबरली प्रियंका

 

सिनेमाच्या शूटिंगवेळी शाहरुख सोबत काम करण्याची संधी मिळाल्याने प्रियंका फार उत्साही होती. मात्र सिनेमाच्या सेटवर शाहरुखच्या विचित्र वागण्यामुळे प्रियंका फार घाबरली होती. प्रियंकाने एका मुलाखतीत म्हटले होते. सिनेमातील एका सीन्सवेळी शाहरुखच्या विचित्र वागण्यामुळे मी माझे डायलॉग विसरली होती.

शाहरुख धरला होता प्रियंकाचा गळा

सिनेमाच्या सेटवर शाहरुख आणि प्रियंकामध्ये वेगळी बॉडिंग तयार झाली होती. मात्र शाहरुखच्या विचित्र वागण्यामुळे प्रियंका धोडी घाबरली होती. शाहरुख आणि प्रियंकामध्ये एका फाइट सीन शूट होत होता. यावेळी शाहरुखने प्रियंका गळा घट्ट धरुन ठेवला होता. प्रियंकाने म्हटले होते, शाहरुखने माझा गळा इतका घट्ट धरला होता ज्यामुळे मी पूर्णपणे घाबरुन गेले. माझे पुढचे डायलॉग काय आहेत हे देखील मी विसरली होती. सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांनी फार डोक्यावर घेतला मात्र आमच्या शानदार केमिस्ट्रीच्या मागे असंख्य गोष्टी घडल्या होत्या.


हेही वाचा – Amir Khan: आमिर खानने फातिमा सन शेख सोबत केलं लग्न? व्हायरल फोटोमागे ‘हे’ आहे सत्य

First Published on: December 23, 2021 7:30 PM
Exit mobile version