‘पठाण’चा 13वा दिवसही ब्लॉकबस्टर; कमावले ‘इतके’ कोटी

‘पठाण’चा 13वा दिवसही ब्लॉकबस्टर; कमावले ‘इतके’ कोटी

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ 25 जानेवारी रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. पठाण चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक चित्रपटाचं तसेच शाहरुख खानचं कौतुक करत आहेत. अनेकांना ‘पठाण’ चित्रपटाची भुरळ पडली आहे. 13 दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून भारतातील अनेक सुपरहिट चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

‘पठाण’ देशभरात हाऊसफुल

भारतातील अनेक चित्रपटगृहांबाहेर ‘पठाण’ हाऊलफुल झाल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच परदेशात देखील रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली आहे. प्रेक्षक शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकजण शाहरुख आणि दीपिकाचं कौतुक करत आहेत. दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे.

 


हेही वाचा : 

तुम्ही आत्ताच सुधरा नाहीतर घरात घुसून मारेन…, कंगनाने पोस्ट शेअर करत दिली धमकी

First Published on: February 7, 2023 8:58 AM
Exit mobile version