Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन तुम्ही आत्ताच सुधरा नाहीतर घरात घुसून मारेन..., कंगनाने पोस्ट शेअर करत दिली...

तुम्ही आत्ताच सुधरा नाहीतर घरात घुसून मारेन…, कंगनाने पोस्ट शेअर करत दिली धमकी

Subscribe

नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी कंगनाने नाव न घेता रणबीर-आलियावर निशाणा साधला होता. अशातच कंगनाने पुन्हा एकदा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर करत सर्वांना कोड्यात पाडलं आहे.

बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना रनौत सामाजिक, राजकीय तसेच बॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकारांवर वादग्रस्त वक्तव्य करत असते. नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी कंगनाने नाव न घेता रणबीर-आलियावर निशाणा साधला होता. अशातच कंगनाने पुन्हा एकदा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर करत सर्वांना कोड्यात पाडलं आहे.

कंगनाची पोस्ट पुन्हा चर्चेत

- Advertisement -

 

कंगनाने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिलंय की, “जे माझी काळजी करत आहेत, कृपया तुम्हाला सांगू इच्छिते गेल्या रात्री माझ्या आजूबाजूला कोणताही संशय निर्माण होईल अशी घटना घडलेली नाही. कॅमेरा घेऊन किंवा कॅमेरा न घेता माझा कोणी पाठलाग करत नाही. जे भूत लाथांनी ऐकतात ते लाथांनीच ऐकतात… चंगू मंगू साठी सूचना : मुलांनो, तुम्ही कोणत्याही अडाणी व्यक्तीशी वैर घेतले नाही. तु्म्ही आत्ताच सुधरा नाहीतर घरात घुसून मारेन. आणि ज्यांना वाटतं मी वेडी आहे पण त्यांना ही गोष्ट ठाऊक नाही मी किती मोठी वेडी आहे.” असं कंगना म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

- Advertisement -

दरम्यान, कालचं कंगनाने तिच्या इंस्टग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने नाव न घेता आलिया-रणबीरवर निशाणा साधला होता. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

‘या’ चित्रपटांमध्ये झळकणार कंगना

कंगना सध्या तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सतत याबाबत ती माहिती देत असते. येत्या काळात कंगना ‘इमरर्जन्सी’ या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसेल शिवाय ती ‘चंद्रमुखी 2’ मध्ये देखील दिसणार आहे.


हेही वाचा :

लतादीदींच्या पहिल्या स्मृतीस स्वरांजली… ही आहेत त्यांची 10 आवडती गाणी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -