अभिनेत्रीचा १४ जणांवर लैंगिक शोषणाचा आरोप

अभिनेत्रीचा १४ जणांवर लैंगिक शोषणाचा आरोप

मलयालम फिल्म इंडस्ट्रीमधिल 14 लोकांवर लैंगिक शोषणाचा आरोप

मलयालम फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Malayalam Film Industry) सध्या अभिनेत्री रेवती संपतने (Revathy Sampath)केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ ऊडाली आहे. 15 जून रोजी मलयालम चित्रपटसृष्टीशी निगडीत अनेक लोकं रेवतीने केलेल्या आरोपानंतर दंग झाले आहेत. सुप्रसिद्ध मलायालम अभिनेत्री रेवती संपत हिने इंडस्ट्री मधिल 14 लोकांवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. रेवतीने एका फेसबुक पोस्टच्या अंतर्गत 14 लोकांच्या नावाचा खुलासा केला आहे. आणि यामध्ये प्रसिद्ध अभिनेता सिद्दीकी याचे नाव सुद्धा समाविष्ट आहे. आरोपीनेचे नाव जाहिर केल्यानंतर रेवतीने फेसबुक पोस्टमध्ये तिला कोणत्याही व्यक्तीची भीती नाही असे जाहीर केले आहे. तसेच गुन्हेगारांना ती संपुर्ण जगासमोर आनणार आहे असे स्पष्ट केल. रेवतीच्या या पोस्टने संपुर्ण मलायलम फिल्म इंडस्ट्रीला हादरवून सोडले आहे. रेवतीच्या अनेक फॅनमध्ये सध्या रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच रेवतीने केलेल्या 14 आरोपींने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाहीये. रेवतीच्या या वक्तव्यानंतर संपुर्ण मलयालम इंडस्ट्री संशयाच्या घेऱ्यात आली आहे. सोशल मीडिया यूजर्सने फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिलांच्या सुरक्षितते संदर्भात चिंता व्यक्त करत, आपला राग जाहीर केला आहे.

कोण आहे रेवती संपत

रेवती संपत मलयालम फिल्म इंडस्ट्री मधिल एक नावाजलेला चेहरा आहे. रेवतीने फिल्म पटनागढ़ मधून तिच्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती. 2018 मध्ये विष्णु उद्यन द्वारा दिग्दर्शित ‘वक्त’ चित्रपटानंतर प्रसिद्धि मिळाली होती.त्यांनी अनेक प्रसिध्द सिनेमात काम केलं आहे.

ॲक्टिंग व्यतिरीक्त 27 वर्षीय रेवती सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहे. रेवतीने कोयंबटूरच्या केएसजी कॉलेज ऑफ आर्ट्स ॲड सायंस मध्ये आपले शिक्षण पुर्ण केलं आहे. रेवती नेहमी जेंडर इक्वॅलिटी भाष्या करत असे. ती नेहनी स्पष्टपणे तिचे मत मांडत असे.

रेवतीने फेसबुक पोस्टमध्ये काय लिहलं आहे

1. अभिनेत्रीने पोस्टमध्ये सांगितले आहे की 14 लोकांनी तिचा फक्त शारीरिक छळच नाही तर मानसिक भावनात्मकरित्याही त्रास दिला आहे. तसेच आरोपींना अपराधी करार दिला आहे.

2. रेवतीने सिद्दीकी व्यतीरिक्त लिस्टमध्ये मशहूर दिग्दर्शक राजेश यांचा देखिल उल्लेख केला आहे. राजेश यांनी अनेक नॅशनल आणि स्टेट लेवलवर  सिनेमासाठी अवॉर्ड्स जिंकले आहेत

3. रेवतीने लिस्टमध्ये डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे नेता नंदु अशोकण सोबतच अनेत पोलिस विभागातील प्रोफेशनमधिल लोकांचे नाव घेतले आहे तसेच यात एका डॉक्टरांचा देखिलं नाव आहे

4. रेवतीच्या या पोस्टवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रीया दिली आहे. तसेच काही लोकं हा एक पब्लिसिटी स्टंट आहे असे बोलत आहे, तर कही लोकांनी रेवतीला समर्थन दिले आहे


हे हि वाचा – 13 वर्षिय फॅनच्या मागणी वर,माधुरीने दिला रिप्लाय

First Published on: June 18, 2021 11:30 AM
Exit mobile version