Lookalike: दयाबेनची हुबेहूब नक्कल करते ‘ही’ ९ वर्षांची मुलगी, एक्टिंग पाहून व्हाल हैराण

Lookalike: दयाबेनची हुबेहूब नक्कल करते ‘ही’ ९ वर्षांची मुलगी, एक्टिंग पाहून व्हाल हैराण

Lookalike: दयाबेनची हुबेहूब नक्कल करते 'ही' ९ वर्षांची मुलगी, एक्टिंग पाहून व्हाल हैराण

हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध शो म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा (tarak mehta ka ooltah chashmah)  ही मालिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे. मालिकेतील सर्वच पात्रांनी आपल्या अभिनयाने रसिक मनावर राज्य केले आहे. यातील सर्वात मजेशीर आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारे पात्र दयाबेन. सध्या दयाबेन मालिकेत दिसत नसली तरी तिचा चाहता वर्ग आजही तिच्या प्रेमात आहे. सध्या सोशल मीडियावर एका ९ वर्षांच्या दयाबेनचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. एक ९ वर्षांची मुलगी दयाबेनची हुबेहुब अँक्टिंग करताना दिसत आहे. या छोट्या मुलगीचे नाव आहे सुमन पुरी. सुमन पंजाबची राहणारी आहे.

सुमनचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असून ती इन्स्टाग्राम रिल्स तयार करत असते. सोशल मीडियावर दयाबेनला पाहून ती तिच्यासारखा हुबेहुब अभिनय करते. ९ वर्षांच्या सुमनचा अभिनय पाहून नेटकरी देखील अवाक झाले आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील दयाबेनचे प्रत्येक डायलॉग तिच्या तोंडपाठ असून ती ते उत्तमरित्या सादर करताना दिसत आहे. एवढच नाही सुमन दयाबेनसारखीच साडी नेसून रिल्स करत असते. साडीच नाही हेअर स्टाईल तसेच मेकअप देखील दयाबेनसारखा करुन व्हिडिओ करत असते.

सुमन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सुमनचे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. सुमन दयाबेनच नाही अभिनेत्री कंगना राणौतला देखील फॉलो करते. सुमन कंगनाची मोठी फॅन आहे. सुमनला छोटी कंगना असे देखील म्हटले जाते.


हेही वाचा – अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीची मुख्यमंत्री व महापौरांकडून विचारपूस

First Published on: October 19, 2021 8:59 PM
Exit mobile version