रतन टाटांच्या आयुष्यावर आधारीत प्रदर्शित होणार चित्रपट; निर्मात्यांनी दिली माहिती

रतन टाटांच्या आयुष्यावर आधारीत प्रदर्शित होणार चित्रपट; निर्मात्यांनी दिली माहिती

देशातील प्रतिष्ठीत व्यक्तींची गोष्ट ऐकायला सामान्य व्यक्तींना नेहमीच रस असतो. यामुळेच चित्रपट निर्माते देखील या व्यक्तींच्या आयुष्यातील संघर्ष, यश चित्रपटातून मांडतात. दरम्यान, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, टाटा ग्रुपचे माजी चेअरमन रतन टाटा यांच्या आयुष्यावर देखील एक जीवनपट तयार करण्याचा निर्णय सुधा कोंगरा यांनी घेतला आहे. या चित्रपटाशी जोडलेल्या सूत्रांनुसार, 2023 च्या शेवटापर्यंत या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.

हा अभिनेता साकारणार रतन टाटा यांची भूमिका
सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रतन टाटा यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी समोर येणार आहेत. ज्या अनेकांना ठाऊक नाहीत. तसेच त्यांचे आयुष्य अनेक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु असून तसेच या चित्रपटात रतन टाटांच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन आणि साऊथ सुपरस्टार सूर्याच्या नावाची चर्चा सुरु आहे. दरम्यान, अजूनही याबाबत कोणती अधिकृत बातमी समोर आली नाही. चाहते रतन टाटांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.

2008 मध्ये रतन टाटांना मिळाला पुरस्कार
रतन टाटा टाटा समूहातील माजी अध्यक्ष होते. ते 2022 मध्ये निवृत्त झाले. नुकताच त्यांना ‘सेवा रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. सोबतच त्यांनी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2008 मध्ये त्यांना ‘पद्म विभूषण’ देखील देण्यात आला होता.

 


हेही वाचा :

ऋचा चड्ढाच्या ट्विटवर अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…

First Published on: November 25, 2022 12:30 PM
Exit mobile version