#MeToo – ए. आर. रेहमानने व्यक्त केलं आश्चर्य!

#MeToo – ए. आर. रेहमानने व्यक्त केलं आश्चर्य!

संगीतकार ए आर रहमान

बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या मीटू चळवळीवर आता संगीत दिग्दर्शक ए. आर. रेहमानने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मीटू चळवळीमध्ये समोर आलेली नावं पाहिलल्यावर आपल्याला आश्चर्य वाटल्याचे त्याने म्हटले आहे. रेहमानने या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. रेहमान म्हणाला की, ‘या मोहिमेअंतर्गत ज्या महिलांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात वाचा फोडली आहे आणि ज्यांचे नाव समोर आले आहे त्यांचे नाव ऐकून मी अचंबित झालो आहे’. रेहमानने सोमवारी रात्री ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला रेहमान?

रेहमानने ट्विटमार्फत दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले आहे की, ‘मी मीटू मोहिमेला अगदी जवळून बघत आहे. यामध्ये समोर आलेल्या काही नावांनी मी हादरुन गेलो आहे. मग ते पीडितेचे नाव असो किंवा शोषण करणाऱ्याचे. मला आपल्या इंडस्ट्रीमधील महिलांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक आयुष्य जगताना बघायचे आहे. ज्या पीडित महिला समोर येत आहेत, त्यांना परमेश्वर लढण्यासाठी बळ देवो. मी आणि माझी टीम हाच प्रयत्न करू की, महिलांसाठी सुरक्षित आणि योग्य असे वातावरण निर्माण व्हावं, जेणेकरून त्यांना खुलेपणाने आपली कलाकृती सादर करता येईल आणि त्यांना यश संपादन करता येईल.’

अनेकांनी केलं #MeTooबाबत भाष्य

तनुश्री दत्ता – नाना पाटेकर प्रकरणानंतर अनेकांनी आता #MeTooच्या माध्यमातून त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत भाष्य केले आहे. दरम्यान, त्यावरून देखील सध्या दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहेत. केवळ एक बाजू ऐकूण निर्णय घेऊ नका असे मत देखील आता मांडले जात आहे. तर अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांनी देखील १० वर्षानंतर का बोलता? असा सवाल केला आहे. #MeTooनंतर कामाच्या ठिकाणी विशाखा समिती नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


हेही वाचा – अत्याचार झाला तेव्हाच आवाज का नाही उठवला?

First Published on: October 23, 2018 1:40 PM
Exit mobile version