गणेश चतुर्थी निमित्त ’आम्ही सारे खव्वये’मध्ये गोडधोड

गणेश चतुर्थी निमित्त ’आम्ही सारे खव्वये’मध्ये गोडधोड

गणेश चतुर्थी निमित्त आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये खमंग पदार्थांचा बेत असणार आहे आणि यामध्ये काही खास पाहुणे मंडळीसुद्धा सामील होणार आहेत. हे विशेष भाग 12 ते 20 सप्टेंबर दुपारी 2 वाजता झी मराठीवर होणार आहेत.या आठवड्यात आम्ही सारे खवय्येच्या किचन मध्ये कलाकारांची रेलचेल असणार आहे. गणपती आगमनाच्या विशेष भागात भारत गणेशपुरे त्यांच्या घरच्या गणपतीच्या आठवणी सांगणार आहेत.

अनेक मालिकांमधील वेगवेगळ्याभूमिका ते चला हवा येवू द्या पर्यंतचा रंजक प्रवास नेमका कसा घडत गेला याचा उलगडा श्रेया बुगडे एका विशेष भागात करणार आहे आणि या भागात श्रेया सोबत तिची आई देखील सहभागी होणार आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार याकार्यक्रमात सहभागी होताना कुटुंबापासून दूर राहावं लागलं आणि त्यावेळचे किस्से अभिनेता योगेश शिरसाट आणि त्याची पत्नी सोनम शिरसाट शेअर करणार आहेत. अगदी लहानपणापासून कलेची आवड असलेल्या तुषारने तीआवड जपून त्याचं व्यावसायिक रुपांतर कसं केलं याचा उलगडा तुषार देवल आणि त्याची पत्नी स्वाती देवल करणार आहेत. डिजिटल युगाला पत्रांच्या जादुई दुनियेत घेवून जाणार्‍या अरविंद जगताप यांनी गाव ते मुंबई हा प्रवास कसा सुरू झाला हे सविस्तर पणे या विशेष भागात मांडणार आहेत.

First Published on: September 15, 2018 3:00 AM
Exit mobile version