आमीर खान आणि कियारा अडवाणीने जाहिरातीमधून हिंदूंच्या प्रथेची उडवली खिल्ली… विवेक अग्निहोत्रींचा आरोप

आमीर खान आणि कियारा अडवाणीने जाहिरातीमधून हिंदूंच्या प्रथेची उडवली खिल्ली… विवेक अग्निहोत्रींचा आरोप

बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांची एका खाजगी बँकेची नवी जाहिरात सध्या सर्वत्र चर्चेत आहे. याबाबत आता अनेक ठिकाणी वादविवाद सुरु झाला आहे. या जाहिरातीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप यावर करण्यात येत आहे. त्यामुळे हिंदू संघटनांकडून याचा तीव्र विरोध केला जात आहे. या विरोधानंतर मध्य प्रदेशते गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याकडून बुधवारी आमीर खानला इशारा देण्यात आला आहे.

माध्यमांसोबत बोलताना नरोत्तम मिक्षा यांनी आमीर खानला सल्ला दिला आहे की, आमीर खानने भविष्यात कोणतीही जाहिरात करण्यापूर्वी भारतीय परंपरा आणि पद्धतींना लक्षात घ्यावे. आमीर खानची खाजगी बँकेची जाहिरात मी सुद्धा पाहिली आहे. जी अजिबात ठीक नाही. आमीर खानच्या वारंवार याप्रकारच्या भारतीय परंपरा आणि पद्धतींचा अपमान केला जाईल अश्या जाहिराती येत आहेत. जे मला योग्य वाटत नाही. कोणत्याही धर्माचा अपमान करण्याची परवानगी आमीर खानला अजिबात नाही.

खरंतर, या जाहिरातीमध्ये आमीर खान एक नवीन लग्न झालेल्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे तर कियारा नववधूच्या भूमिकेत दिसत आहे. यामध्ये लग्न झाल्यानंतर वधू आपल्या पतीला तिच्या घरी घेऊन जाते आणि यावेळी ती म्हणते की, पाठवणी होऊनही वधू रडली नाही असं पहिल्यांदाच झालं असेल. तसेच तिच्या घरी गेल्यावर गृह प्रवेश करताना आमीर तिला विचारतो की घरात पहिलं पाऊल कोण टाकेल? तेव्हा ती या घरामध्ये नवीन कोण आहे? असं म्हणते, यावर आमीर घरामध्ये प्रवेश करतो. जे हिंदू प्रथे विरुद्ध आहे. त्यामुळेच या जाहिरातीचा विरोध केला जात आहे.


हेही वाचा :

‘मिली’ चित्रपटात जान्हवी कपूर नव्या भूमिकेत; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

First Published on: October 13, 2022 11:35 AM
Exit mobile version