आमिर खानची बहिण ‘या’ चित्रपटात करणार अभिनय

आमिर खानची बहिण ‘या’ चित्रपटात करणार अभिनय

अमिर खान- निखत खान

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची निर्मिती असेलेला ‘सांड की आंख’चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जगातील सर्वांत वृद्ध महिला शार्पशूटर्सच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. पण या चित्रपटा बद्दल आणखी एक गोष्ट समोर आली आहे. आमिर खानची बहीण पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

शूटर आजीच्या पात्राबरोबर आणखी एक पात्र चित्रपटात महत्त्वाचं आहे. ही भुमिका आमिर खानची बहीण निखत खान यांनी साकारली आहे. निखत एका महाराणीच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मात्र तिच्या भूमिकेविषयी अद्याप सविस्तर खुलासा करण्यात आलेला नाही.चित्रपटात तापसी आणि भूमीसह प्रकाश झा आणि विनीत सिंहदेखील प्रमुख भूमिकेत आहेत.

First Published on: May 5, 2019 2:14 PM
Exit mobile version