‘हे माझ्याविरोधातील राजकीय षडयंत्र’

‘हे माझ्याविरोधातील राजकीय षडयंत्र’

कवी मनाचा नेता अभिजीत बिचुकले निघाले पंढरीच्या वारीला, मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

बिग बॉसच्या घरातील सर्वात गाजलेला स्पर्धक अभिजीत बिचुकले याला सातारा पोलिसांनी चेक बाउन्सप्रकरणी अटक केली होती. परंतु, ही अटक म्हणजे माझ्याविरोधात रचल्या जाणाऱ्या कट-कारस्थानाचा भाग आहेत असा आरोप अभिजीत बिचुकलेनं केलाय.
अभिजीत बिचकुलेला गोरेगाव फिल्मसिटीतील ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. साताऱ्यातील कोर्टात त्याला हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु, त्याआधी छातीत दुखल्याचे कारण सांगून अभिजीत बिचुकले याला उपाचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

‘माझ्या विरोधात तक्रार करणारे संदीप संपकाळ यांच्या घरी माझं कुटुंब गेली १२ वर्ष भाड्यानं राहातं. आम्ही त्यांना नियमीतपणे भाड्याचे पैसे देतो. आमचे कौटुंबिक संबंधही चांगले होते. परंतु, अचानक त्यांनी इतकी जुनी केस का उकरून काढली हे मला समजत नाही. माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार करणं हा राजकीय कट आहे. संदीपला माझ्याविरोधात भडकवण्यात आलं आहे. राजकीय स्वार्थासाठी हे केलं जातंय. मी विधानसभेला उभं राहणार ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे. मी निवडणूक लढवावी असं न वाटणाऱ्यांनी हे कृत्य केलंय’ असंही तो म्हणाला. अभिजीतला चेकबाउन्स प्रकरणी जामीन मिळाला असला तरी खंडणी प्रकरणात अभिजीतला अद्याप जामीन मिळाला नाहीये. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

रूपालीला केली होती शिवीगाळ

अभिजीत बिचुकले याने बिग बॉसच्या एका टास्कदरम्यान सदस्य रूपाली भोसले हीला अपशब्द वापरले होते, शिवीगाळ केली होती. एका महिलेला शिवीगाळ केली म्हणून त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढा अशी तकरार भाजपाच्या माजी नगरसेवका रितू तावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

अभिजीत बिचुकले याच्या अटकेनंतर आता तो पुन्हा शोमध्ये दिसणार की नाही याबाबत मात्र अद्याप साशंकता आहे. कलर्स वाहिनीकडूनही याविषयी अद्याप अधिकृतरित्या काहीही जाहीर करण्यात आलेलं नाही.

कोण आहेत अभिजीत बिचुकले

First Published on: June 22, 2019 5:35 PM
Exit mobile version