घरमनोरंजनअभिजीत बिचुकले यांना बिग बॉसच्या घरातून अटक

अभिजीत बिचुकले यांना बिग बॉसच्या घरातून अटक

Subscribe

बिग बॉसच्या घरातून सदस्य अभिजीत बिचुलके यांना अटक करण्यात आली आहे. साताऱ्यात चेक बाऊन्सप्रकरणी सातारा पोलिसांनी अभिजीतल्या बेड्या ठोकल्या आहेत. आज बिग बॉसच्या घरात जाऊन अभिजीतला अटक करण्यात आली.आरे पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांनी बिचुकलेंना अटक केली आहे.

- Advertisement -

सातारात चेक बाऊन्सप्रकरण अभिजीत यांना चांगलच भोवलं आहे. त्यांना यामुळे बिग बॉसचं घर सोडावं लागलं आहे. या आधी दोन दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात महिलेला अपशब्द वापरल्यामुळे अभिजीत बिचुकले यांची भाजपाच्या माजी नगरसेविकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. टास्कदरम्यान रूपाली भोसलेशी झालेल्या वादात अभिजीत यांनी रूपालीला शिव्या दिल्या होत्या.

- Advertisement -

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेंनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.

बिग बॉसच्या घरात रंगणार शेरास सव्वा शेर कार्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -