अभिनव-श्वेता यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर,श्वेताच्या आरोपाचे खंडन करत अभिनवने शेअर केला व्हिडिओ

अभिनव-श्वेता यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर,श्वेताच्या आरोपाचे खंडन करत अभिनवने शेअर केला व्हिडिओ

अभिनव-श्वेता यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर,श्वेताच्या आरोपाचे खंडन करत अभिनवने शेअर केला व्हिडिओ

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिझा पती अभिनव कोहली यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. तसेच श्वेता तिच्या प्रोफेशनल लाइफ व्यतिरिक्त तिच्या खाजगी आयुष्याबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर तसेच माध्यमांवर मोठ्या प्रमाणात रंगतात. अभिनेत्री श्वेता तिवारी हिने तिचा पती अभिनव कोहली याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. या प्रकारानंतर श्वेता आणि तिची मुलगी पलक या दोघींनी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी अभिनवने श्वेता मुलाला भेटू न देण्याचा तसेच शूटिंग दरम्यान मुलाला एकटं सोडल्याचा असल्याचे आरोप केले होते. तसेच अभिनवने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये श्वेतावर मुलाला बेकायदेशीररित्या ताब्यात घेत असल्याचा आणि “अज्ञात ठिकाणी” ठेवत असल्याचा आरोप करताना दिसत आहे.आरोप प्रत्यारोपाच्या या खेळी नंतर श्वेताने देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर व्हिडिओ शेअर करत आपबीती सांगितली होती. तसेच श्वेताने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेक कलाकार तसेच चाहते श्वेताच्या पाठीशी उभे राहिले होते. अनेकांनी श्वेताला संपूर्णपणे पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.

पण आता चित्र संपूर्णपणे बदल्याचे दिसत आहे. श्वेताचा डाव तिझ्यावर पालटला असल्याचे दिसून येत आहे. श्वेताच्या व्हायरल व्हिडिओ नंतर पती अभिनव कोहली याने पुन्हा व्हडिओ पोस्ट करून श्वेताने केलेल्या आरोपाचे खंडन केलं आहे.

व्हिडिओ मध्ये काय म्हणाला अभिनव –  रेयांश अभिनवशी खेळताना दिसत आहे. खेळताना रेयांश म्हणतो की, त्याला पप्पाकडे जायचे आहे.दुसऱ्या व्हिडीओमध्ये अभिनव रेयांशला विचारतो की जेव्हा पोलीस घरी आले होते तेव्हा तू मम्माला काय सांगत होतास? त्यावर रेयांश म्हणतो,’मी असं म्हणत होतो की मला मम्माकडे जायचे नाही.’अभिनवने  शेअर केलेला व्हिडीओ एक तासाहून अधिक कालावधीचा आहे


हे हि वाचा – आरती सिंगला लस घेताना व्हिडिओ काढणे पडले महाग

First Published on: May 12, 2021 2:12 PM
Exit mobile version