आराध्याला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांवर भडकला अभिषेक बच्चन, म्हणाला…

आराध्याला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांवर भडकला अभिषेक बच्चन, म्हणाला…

आराध्याला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांवर भडकला अभिषेक बच्चन, म्हणाला...

‘बॉस बिस्वास’ या आगमी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला असलेला अभिनेता म्हणजे अभिषेक बच्चन. अभिषेक सध्या त्याचा सिनेमामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकताच त्यांच्या मुलीचा म्हणजेच आराध्या बच्चनचा वाढदिवस झाला. संपूर्ण फॅमिलीने आराध्याच्या वाढदिवसासाठी खास मालदिवची ट्रीप प्लॅन केली होती. मुलीच्या वाढदिवसाचे अनेक फोटो देखील दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. आराध्याच्या वाढदिवसानिमित्त तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र काहींनी तिला ट्रोल देखील केलं होतं.मात्र अभिषेकनं  नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत आराध्याला ट्रोल करणाऱ्याला चांगलचं सुनावलं आहे.

अभिषेकने म्हटलं की, ‘माझ्या मुलीला ट्रोल करणाऱ्याला मी कोणत्याही प्रकारे स्वीकारू शकत नाही. ही गोष्ट मला अजिबात सहन होत नाही. मी एक सेलिब्रेटी आहे पण माझ्या मुलीचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे जे काही ट्रोल करायचे आहे ते मला माझ्यासमोर येऊन करा’, असे अभिषेकने म्हटले आहे.

अभिषेक त्याच्या मुलीवर जिवापाड प्रेम करतो हे त्याच्या अनेक वागण्यातून त्याचप्रमाणे सोशल मीडियावरील अनेक पोस्टमधून दिसून आलं आहे. नुकताच मालदिवमध्ये आराध्याचा वाढदिवस साजरा झाला त्यावेळी, अभिषेकने आराध्यासाठी खास पोस्ट लिहीत शुभेच्छा दिल्या होत्या. अभिषेकने पोस्टमध्ये म्हटलं होतं की, ‘माझी परी आज १० वर्षांची झाली. आराध्या माझा श्वास आहे. तू माझे जीवन आहेस, माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’, अशा प्रेमळ शुभेच्छा दिल्या होत्या.

‘द बिग बुल’ सिनेमानंतर अभिषेक बच्चन पुन्हा एकदा ‘बॉब बिस्वास’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा ३ डिसेंबर रोजी झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात अभिषेकसोबत अभिनेत्री चित्रांगदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


हेही वाचा – Most Searched Celebrity of 2021: सिद्धार्थ शुक्ला २०२१च्या टॉप सर्चच्या यादीत 

First Published on: December 4, 2021 5:18 PM
Exit mobile version