अभिनेत्री श्रुती मराठे सोबत झाले होते कास्टिंग काऊच

अभिनेत्री श्रुती मराठे सोबत झाले होते कास्टिंग काऊच

अभिनेत्री श्रुती मराठे

ह्यूमन ऑफ बाँम्बेच्या अधिकृत इस्टाग्राम पेजवरअभिनेत्री श्रुती मराठेने एक खळबळजनक खुलासा केला आहे. काही वर्षांपूर्वी आपल्याला देखील कास्टिंग काउचचा अनुभव आला होता, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. मी एका चित्रपटासाठी ऑडिशन देत होती, त्यावेळेस चित्रपटाच्या निर्मात्याने आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. यावर त्या निर्मात्याला सडेतोड उत्तर दिल्याने त्याची बोलतीच बंद झाल्याचे तिने या पोस्टद्वारे सांगितले आहे. २००८ साली ‘सनई चौघडे’ या मराठी चित्रपटातून तिने अभिनयाच्या क्षेत्रात प्रदार्पण केले.

काय आहे पोस्ट

या इस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिताना श्रुती म्हणाली एका चित्रपटासाठी ऑडिशन देत असताना माझे निर्मात्या सोबत साधारण बोलणे सुरु होते. मात्र यावेळी निर्मात्याने आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मी तसे करु शकत नसल्याने त्याला तात्काळ स्पष्ट पणे नकार दिला. यावर श्रुती त्याला ठणकावत म्हणाली जर तुम्हाला अस वाटतं की मी तुमच्यासोबत झोपावं, तर मग तुम्ही कोणत्या अभिनेत्या सोबत झोपता? असे बोल्यावर तो गप्पच बसला. यानतंर झाला प्रकार तिने आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर केला. त्यावेळी त्यांनी मला तो प्राजेक्ट सोडून देण्याचा सल्ला दिला.

आणखी एका प्रसंगाबद्दल सांगितले

या पोस्टखाली तिने अणखी एक अनुभव शेअर केला आहे. श्रुतीने दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटासाठी तिने काही बिकनी सिन दिले होते. यानंतर काही वर्षांनी छोट्या पडद्यावर तिची मालिका आली, यावेळी तिचे बिकनीतील फोटो इंटरनेटवरुन व्हायरल करत तिला ट्रोल करण्यात आले होते. या अनुभवा विषयी बोलताना या सगळ्या घटनांमुळे तुमच्या आत्मसन्मानाला किती इजा पोहोचते याची तुम्हाला कल्पना आहे का? असे लिहत श्रुतीने तिच्या भावना परखड पणे मांडल्या आहेत. आपण त्या निर्मात्याला परखड उत्तर दिले ते केवळ आपल्यासाठी नाही, तर कास्टिंग काऊच सारख्या घटनांना समोरे जाणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी असल्याचे तिने या पोस्ट द्वारे म्हटले आहे.

झी मराठी वरील मालिका राधा बावरी, त्याच प्रमाणे रमा माधव, तुझी माझी लव स्टोरी या मराठी चित्रपटात तसेच बुधीया सिंह, वेडिंग एनिवर्सरी या चित्रपटातून तिने काम केले आहे. या आधी ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेत अंगुरी भाभीचा रोल करणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शिंदेने देखील कास्टिंग काऊच बद्दल खुलासा केला होता. तर अलिकडेच मीटू मोहिमे मुळे संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघाले होते.

 

 

First Published on: April 5, 2019 6:29 PM
Exit mobile version