घरमुंबईयाकरता लिपिकाने केली चक्क शरीरसुखाची मागणी

याकरता लिपिकाने केली चक्क शरीरसुखाची मागणी

Subscribe

कल्याण डोंबिवली महापालिका ही भ्रष्टाचार आणि लाचखोरीने बदनाम झाली असतानाच, पालिकेत भ्रष्टाचाराचा घृणास्पद प्रकार घडला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका ही भ्रष्टाचार आणि लाचखोरीने बदनाम झाली असतानाच, पालिकेत भ्रष्टाचाराचा घृणास्पद प्रकार घडला आहे. थकीत मालमत्ता कराला मुदतवाढ मिळावी व मालमत्ता कर कमी करावा यासाठी पालिकेतील लिपीकाने लाच म्हणून चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. रमेशचंद्र राजपूत असे त्या लिपीकाचे नाव असून, ठाणे लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने त्याला मैदानात रंगेहात अटक केली. महापालिकेत एकिकडे अंदाजपत्रक सादर होत असतानाच दुसरीकडे हा प्रकार घडल्याने विरोधकांनी सत्ताधारी व प्रशासनावर तीव्र टीका केली आहे.

रंगेहात अटक

महापालिकेच्या मुख्यालयाच्या शेजारीच असलेल्या इमारतीत क प्रभाग क्षेत्र कार्यालयाची इमारत आहे. सध्या महापालिकेची थकित मालमत्ता कर वसुलीची मोहीम जोरदारपणे सुरू असून, पालिकेकडून अनेकांना जप्ती वारंट बजावण्यात आले आहे. क प्रभाग क्षेत्रांतर्गत असलेल्या एका घराच्या थकित मालमत्ता करापोटी लिपीक राजपूत याने जप्ती वॉरंटची अंतिम सुचना संबधित मालमत्ताधारकाला बजावली हेाती. मात्र मालमत्ता कर भरण्यास मुदत वाढवून देण्यासाठी व मालमत्ता कराची रक्कम कमी करून देण्यासाठी लाचेच्या स्वरुपात राजपूत यांनी संबधित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. यासंदर्भात त्या महिलेने ठाणे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. गुरूवारी दुपारच्या सुमारास राजपूतने त्या महिलेला नजीकच्या सुभाष मैदानात बोलावले होते. अॅन्टी करप्शनच्या पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावून राजपूतला रंगेहात अटक केली. दरम्यान आतापर्यंत महापालिकेचे अनेक अधिकारी- कर्मचारी लाच म्हणून पैसे घेताना रंगेहात सापडले आहेत. मात्र लाच म्हणून थेट शरिरसुखाची मागणी करणाऱ्या या लिपिकाच्या घृणास्पद प्रकाराने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -