अभिनेते धर्मेंद्र यांना साधना सोबत करायचं होतं सिनेमात काम,पण स्क्रिन टेस्टदरम्यान झाले रिजेक्ट

अभिनेते धर्मेंद्र यांना साधना सोबत करायचं होतं सिनेमात काम,पण स्क्रिन टेस्टदरम्यान झाले रिजेक्ट

अभिनेते धर्मेंद्र यांना साधना सोबत करायचं होतं सिनेमात काम,पण स्क्रिन टेस्टदरम्यान झाले रिजेक्ट

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते तसेच ‘हीमॅन’ अशा नावाने ओळखले जाणारे धर्मेंद्र (Dharmendra) यांनी हिंदी सिनेसृष्टीत एक काळ गाजवला होता. त्यांचे प्रत्येक चित्रपट हिट ठरले होते. सोशल मीडियावर त्यांची खुप मोठी फॅन फॉलोंईंग आहे. अभिनेते धर्मेंद्र सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. ते नेहमीच आपल्या व्यक्तीगत तसेच व्यवसायिक जिवनातील घडामोडींबाबत चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतच त्यांनी आपल्या एका को-स्टारच्या आठवनीत एक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच फोटोला भले मोठे कॅप्शन देत आपल्या मनातील गोष्टींचा उलगडा केला आहे. दिग्गज अभिनेत्री साधना (Sadhana)सोबतचा एक रोमॅंटीक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत धर्मेंद्र यांनी लिहलं आहे की, “साधना, एक उत्तम कलाकार तसेच एक उत्तम व्यक्ती आहे. ‘लव इन शिमला’ या सिनेमात काम करण्यासाठी मी स्क्रीन टेस्ट दिली होती. पण मला रिजेक्ट करण्यात आलं. मला याचं आजही दु:ख होत आहे. मी साधना सोबत एकाच सिनेमात काम करु शकलो.”  हि घटना ‘लव इन शिमला’ या सिनेमातील असून ती 1960 साली घडली होती. या सिनेमात साधना सोबत जॉय मुखर्जी झळकले होते.(Actor Dharmendra wanted to work with Sadhana in the film but  Dharmendra rejected during the screen test)

धर्मेंद्र आणि साधना  1970 साली ‘इश्क पर जोर नहीं’ या सिनेमात एकत्र झळकले होते. सिनेमात धर्मेंद्र, साधना सोबत बिस्वजीत, कामिनी कौशल यांच्यासुद्धा महत्वपुर्ण भूमिका होत्या.



हे हि वाचा – आमिर-किरण रावच्या घटस्फोटाच्या निर्णायावर हिना खानचा मोठा खुलासा म्हणाली…



 

First Published on: July 5, 2021 11:25 AM
Exit mobile version