Kartik Aryanच्या क्रेझी फॉलोअर्स! घराबाहेर ओरडून ओरडून घातला गोंधळ, पहा व्हिडीओ

Kartik Aryanच्या क्रेझी फॉलोअर्स! घराबाहेर ओरडून ओरडून घातला गोंधळ, पहा व्हिडीओ

Kartik Aryanच्या क्रेझी फॉलोअर्स! घराबाहेर ओरडून ओरडून घातला गोंधळ, पहा व्हिडीओ

बॉलिवूड कलाकारांचे फॅन्स त्यांची एक झलक पाहण्यासाठी काहीही करू शकतात हे आपण अनेकदा पाहिले आहे. बॉलिवूडचा सध्याचा आघाडीचा अभिनेत असलेल्या कार्तिक आर्यनची (Kartik Aryan)  एक झलक पाहण्यासाठी त्याच्या फॅन्सनी केलेला आटापिटा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कार्तिक आर्यनच्या दोन फॅन्स कार्तिकला फॉलो करत त्याच्या घरापर्यंत गेल्या. घरापर्यंत जाऊन नुसत्या फोटो काढून परत फिरल्या तर त्या कार्तिक आर्यनच्या फॅन्स कसल्या. कार्तिकच्या घराखाली त्यांनी तुफान गोंधळ घातला आणि कार्तिकच्या दोन क्रेझी फॉलोअर्सच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यनच्या दोन फॅन्स त्याच्या घराखाली त्याचा पाठलाग करत येतात. घराखाली उभ्या राहून दोघी कार्तिकला मोठ्या मोठ्याने हाका मारताना दिसल्या. कार्तिक प्लिज खाली ये कार्तिक प्लिज खाली ये अशा मोठ्याने हाका मारत मुली रस्त्यावर तुफान आरडा ओरडा करताना दिसत आहेत. दोघींचा व्हिडीओ कोणीतरी शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ट्विटरवर देखील कार्तिक आर्यन अनेक फॅन्सने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

कार्तिक आर्यन त्याच्या फॅन्ससोबत फार प्रामाणिक आहे. आपल्या फॅन्स घराबाहेर भेटण्यासाठी थांबल्या आहेत हे कळल्यानंतर कार्तिक आर्यन दोघींना भेटण्यासाठी घराच्या खाली आला. त्याच्या दोन्ही फॅन्ससोबत कार्तिकने फोटो काढले. कार्तिकच्या दोन्ही फॅन्स त्याला भेटून फार खुश झाल्या होत्या. दोघींना कार्तिकला भेटण्यासाठी प्रचंड इच्छा होती आणि कार्तिकने दोघींची इच्छा पूर्ण केली.

 

कार्तिक आर्यनच्या अनेक फॅन पेजवरुन या मुलींचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी कार्तिक आर्यनला हा व्हिडीओ टॅग देखील केला आहे. कार्तिकच्या फॅन मुमेंट्स अनेक वेळा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पहायला मिळाल्या आहेत. मुलींच्या या व्हायरल व्हिडीओनंतर पुन्हा एकदा कार्तिक आर्यनच्या फॅन फॉलोवर्सचा जलवा सर्वांना पहायला मिळाला आहे.

कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाल्यास कार्तिक आगमी काळात ‘फ्रेडी’, ‘कॅप्टन इंडिया’, ‘भूल भुलैया २’ आणि ‘शहजादा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच कार्तिकचा धमाका हा सिनेमा देखील काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. येत्या काळात कार्तिक पुन्हा एकदा नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला आणि फॅन फॉलोविंग वाढवायला सज्ज आहे


हेही वाचा – Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding: फरहान – शिबानी मार्चमध्ये विवाह!

First Published on: January 5, 2022 5:29 PM
Exit mobile version