यासाठी मिलिंद सोमणने डिलीट केले ‘टिकटॉक अॅप’

यासाठी मिलिंद सोमणने डिलीट केले ‘टिकटॉक अॅप’

अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

चीनच्या वुहान शहरातून पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेढीस धरले आहे. त्यामुळे आता अनेकांनी चीनची उत्पादने न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच चीनी अॅप देखील न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता सोशल मीडियावर कमालीची क्रेझ असणाऱ्या अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणने देखील एक पाऊल पुढे टाकले आहे. मिलिंदने ट्विटवरुन सर्व चीनी उत्पादनांवर बहिष्कार घालणार असल्याचे सांगितले असून त्याप्रमाणे त्याने एक व्हिडिओ शेअर करत #BoycottChineseProducts हा हॅशटॅग वापरत सोशल मीडियावरील त्याच्या फॉलोवर्सना चीनमधून येणाऱ्या उत्पादनांचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे.

चीनचे सर्व सॉफ्टवेअर वापरणे बंद करा

या व्हिडीओमध्ये त्यांनी चीन आणि भारतातील सद्यपरिस्थितीवरही भाष्य केले असून सोनम म्हणाले की, ‘चीनचे सर्व सॉफ्टवेअर एका आठवड्यात सोडून द्या. यासोबतच सर्व हार्डवेअरही एका आठवड्यात सोडून द्या. या बहिष्काराला आंदोलनाचे रूप मिळाले पाहिजे.’

दरम्यान, हा व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘#BoycottChineseProducts मी आता टिकटॉकवर नाहीये.’ मी टिकटॉक डिलीट केले आहे. यासोबतच त्याने फॉलोवर्सलाही चीनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी मिलिंद मोठ्या प्रमाणात टिकटॉकचा वापर करायचा. तसेच इन्स्टाग्रामवरही त्याचे अनेक टिकटॉक व्हिडीओ शेअर केले होते. पण, आता चीन सरकारच्या राजकारणामुळे त्याने चीनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा – …आणि सोनू सूदला राज्यपालांनी बोलावले भेटायला


 

First Published on: May 31, 2020 2:23 PM
Exit mobile version