अभिनेते पराग बेडेकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अभिनेते पराग बेडेकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मराठी टेलिव्हिजन, चित्रपट आणि नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते पराग बेडेकरचे यांचे वयाच्या 47 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. पराग यांच्या मृत्यूने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. पराग यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

पराग बेडेकर मागील तीन वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत होते. मागील 5 वर्षांपूर्वी त्यांच्या जठराचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे त्यांना फारसे काम करता येत नव्हते. 13 डिसेंबर रोजी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला 14 डिसेंबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.

पराग यांनी कॉलेजमध्ये असल्यापासून अभिनयाला सुरुवात केली होती. पराग यांनी व्यावसायिक रंगभूमीवरून पदार्पण केलं. नंतर त्यांनी यदा कदाचित, मी नथुराम गोडसे बोलतोय, पोपटपंची, सारे प्रवासी घडीचे, लाली लीला अशा अनेक नाटकांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय पराग यांनी ‘कुंकू’, ‘चारचौघी’, ‘एक झुंझ वादळाशी’, ‘ओढ लावावी जिवा’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्येदेखील काम केले होते.

पराग यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही काम केले होतं. निधनामुळे मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पराग यांच्या निधनाचं वृत्त समजताच अनेक सहकलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

 


हेही वाचा :

‘साथ सोबत’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

First Published on: December 15, 2022 3:20 PM
Exit mobile version