पैशाच्या तंगीमुळे माशी पडलेली लस्सी देखील प्यायला; आता बनला बॉलिवूड किंग!

पैशाच्या तंगीमुळे माशी पडलेली लस्सी देखील प्यायला; आता बनला बॉलिवूड किंग!

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शहारूख खानने आपल्या अनोख्या स्टाईलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मग ते त्याच ककक….किरण असो की त्याची डान्सिंग स्टाईल त्याच्या प्रत्येत स्टाईलचे प्रेक्षक दिवाने आहेत. गेले काही दिवस शाहरूख चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. गेले काही दिवसात शाहरूखने आपल्या कोणत्याच नवीन चित्रपटाची अनाऊंसमेंट केलेली नाही. त्यामुळे शाहरूखचे चाहते नाराज आहेत. मोठ्या पडद्यावर नाही तर लवकरच शाहरूख छोट्या पडद्यावर दिसणार आहे. नुकतेच शाहरूखने डान्स प्लस ५ चे शुटींग पुर्ण केलं आहे. या सेटवरचे शाहरूखचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या साठी शाहरूखने तब्बल ६ तास शुटींग केले. यावेळी शाहरूखने अनेक गोष्टींचा खुलासाही केला.

यावेळी शाहरूख ताज ला भेट दिल्याचा एक किस्सा सांगितला. जेव्हा शाहरूखला पहिला पगार ५० रूपये मिळाला तेव्हा तो ताजमहाल बघायला निघाला. यावेळी त्याचा संपूर्ण पगार रेल्वे तिकीटावर खर्च झाला. केवळ लस्सी पिण्या ऐवढे पैसे उरले होते. शाहरूख म्हणाला उरलेल्या पैशातून मी एक लस्सी विकत घेतली. यात मधमाशी पडली होती. पण तरीही मी ती लस्सी प्यायली. आणि परत येताना पुर्ण प्रवासात उलट्या करत आलो.

त्याचप्रमाणे शाहरूख म्हणाला, मी जेव्हा ९५ वर्षांचा होईल तेव्हा मी छैय्या छैय्या गाण्यावर डान्स करेन. ट्रेनच्या छतावर व्हिलचेअरवर बसून रेमोला घेऊन मी डान्स करेन.

First Published on: January 21, 2020 1:47 PM
Exit mobile version