टायगर श्रॉफने आलियासोबत केला असा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

टायगर श्रॉफने आलियासोबत केला असा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ चित्रपटसृष्टीत आपल्या स्टंट आणि डान्सकरिता ओळखला जातो. आतापर्यंत आलेल्या सगळ्या चित्रपटात त्याच्या डान्स आणि अॅक्शन स्टाईलचे चाहते दिवाने आहेत. टायगर श्रॉफ हा अभिनेता आपल्या डान्सबद्दल जेवढा सतर्क असतो तेवढाच तो सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असतो.

नुकताच अभिनेता टायगरने इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये टायगर श्रॉफसोबत आलिया भट्ट देखील दिसत असून या दोघांचा एक भन्नाट डान्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दोघे अनोख्या डान्स फॉर्ममध्ये नृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना टायगरने कॅप्शनमध्ये आलिया भट्ट, फराह खान आणि पुनित मल्होत्राला टॅग करत त्यांना असे विचारले आहे की, ‘जर तुमच्याकडे कोणती शक्ती असेल, तर ती कोणती असेल?’ असा प्रश्न विचारला आहे.

First Published on: June 7, 2019 1:59 PM
Exit mobile version